Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Anudan Shasan Nirnay ] : अवेळी पाऊस व गारपीट आपादग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी देण्याच्या अनुषंगाने निधी वितरीत करणेबाबत , राज्य शासनांच्या सहकारी , पणन व वस्त्रोद्योग विभागांकडून दिनांक 31 मार्च 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सन 2023-24 या आर्थिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना , 2017 लेखाशिर्ष 24350082 , 33- अर्थसहाय्य या अंतर्गत उपलब्ध असलेल्या निधीतून पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करण्यात आलेला रुपये 2.11 लाख इतका निधी रत्नागिरी जिल्ह्यातील माहे फेब्रुवारी व मार्च 2015 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित शेतकऱ्यांना 3 महिन्यांची व्याजमाफी शासनामार्फत अदा करण्यासाठी अवेळी पाऊस व गारपीट आपदग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी 24252453 – 33 अर्थसहाय्य या लेखाशिर्षापर्यात वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे .

सदर तरतुद खर्च करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधिनस्त सहाय्यक निबंधक यांना अधिकारी म्हणून नियुक्त प्राधिकृत करण्यात येत आहेत . त्याचबरोबर सदर लेखाधिकारी , अधिन सहकार आयुक्त व निबंधक , सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहेत .

सदरची रक्कम ही इतर खर्च , अवेळी पाऊस व गारपीट आपदग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी , अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखाली पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करुन दिलेल्या तरतुदीमधून खर्च करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील सहकार व पणन व वस्त्रोद्योग विभागांकडून दिनांक 31 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *