Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Anudan Shasan Nirnay ] : राज्यात मे 2023 मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरीता राज्य शासनांच्या महसूल व वन विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यात अतिवृष्टी , पुर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास , पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरीता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरुपात एका हंगामा मध्ये एक वेळेस या प्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहीत दराने मदत देण्यात येते , तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरीता देखिल विहीत दराने मदत देण्यात येत असते . महसूल व वन विभागाच्या दिनांक 27 मार्च 2023 नुसार राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीकरीता मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरीता देखिल विहीत दराने मदत देण्यात येते .
सदर शासन निर्णयानुसार मे 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरीता राज्य शासनाच्या निधीमधून दिनांक 27.03.2023 रोजीच्या निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेल्या दरानुसार शेतीपिके नुकसानीसाठी एकुण 223.95 लक्ष रुपये इतका निधी जिल्हानिहाय वितरीत करण्यास सदर शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात येत आहेत .
यानुसार नंदुरबार जिल्ह्यात एकुण 54 बाधति शेतकरी आहेत , त्यांना एकुण रुपये 5.56 लक्ष तर जळगाव जिल्ह्यातील एकुण 1138 बाधित शेतकरी असून , त्यांना 127.89 लाख रुपये अनुदान तर अहमदनगर जिल्ह्यातील एकुण 891 बाधित शेतकरी संख्या असून त्यांना एकुण 90.50 लाख रुपये ऐवढे अनुदानाचे वितरण करण्यात येत आहेत .
सदरचा मदत निधी प्रदान करण्याकरीता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या लेखाशिर्षाखाली वितरीत करण्यात आलेला निधी खर्च करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पुर्ण झाल्याच्या नंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशिल हा जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे . या संदर्भात महसुल व वन विभागांकडून दिनांक 15 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..