खास शेतकऱ्यांसाठी विविध प्रयोजन करीता देण्यात येणारे कर्ज ( वित्त ) पुरवठा योजना ; जाणुन घ्या सविस्तर !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Agricultures Loan For Various Prayojan ] : शेतकऱ्यांसाठी विविध प्रयोजन करीता बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत कर्ज उपलब्ध करुन दिले जाते , ज्यांमध्ये शेतकऱ्यांना कमी व्याजदरांमध्ये तसेच शासनांच्या अनुदान योजनांचा लाभ प्राप्त करुन दिला जातो .

शिवाय कर्जाची परफेड ही शेतकऱ्यांच्या सोयीनुसार मासिक / त्रेमासिक / सहामाही / वार्षीक पद्धतीने अदा करण्याची पसंती दिली जाते . तसेच शासनांचे अनुदान प्राप्त होत असल्यास , त्यांस बँकेमार्फत सहाय्य केले जाते . नेमक्या कोणकोणत्या प्रयोजन करीता कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिले जाते , या संदर्भातील सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

01.महाबँक किसान क्रेडीट कार्ड ( एमकेसीसी ) : सदर कर्ज योजनांचे खास वैशिष्ट्ये म्हणजे 7 टक्के व्याजदरांमध्ये 30 लाख रुपये पर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिले जाते , ज्याची मर्यादा ही 5 वर्षांची असते , या कर्ज सुविधांचा लाभ घेण्याकरीता राज्यातील कोणताही शेतकरी लाभ घेवू शकतो . शेतकऱ्यांना पिकांची लागवड , कापणी, घरगुती गरजा , अवजारांची देखभाल या बाबींकरीता कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिले जाते .

02.महाबँक किसान सर्वलक्ष्यी मुदत कर : सदर मुदत कर योजना अंतर्गत दीर्घ मुदतीच्या कालावधीसह मुदत कर्जाच्या सर्व आवश्यकतांसाठी शेतकऱ्याला तंटामुक्त एकल मुदत कर्ज मर्यादा निर्माण करण्याच्या उद्देशाकरीता सुविधा उपलब्ध करुन दिले जाते . सदरची रक्कम ही शेतकऱ्यांने सादर केलेल्या पुढच्या 2-3 वर्षांमध्ये हाती घेण्यात आलेल्या गुंतवणूक योजनांवर आधारित असणार आहे . तसेच ही योजना कृषी व संबंधित उपक्रमांशी निगडीत असणाऱ्या संबंधित गुंतवणूक विकासाच्या उपक्रमांचे संयोजन असू शकणार आहेत .

3. शेतकऱ्यांना फार्म हाऊस बांधणी करण्यासाठी कर्ज योजना

4. वाहनांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची योजना ( यांमध्ये 2 /3 व्हीलर्स करीता कर्ज सुविधा )

5.वाहनांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची योजना ( यांमध्ये ट्रक्टर , जेसीबी इ. )

6.शेतकऱ्यांना वेअरहाऊसच्या पावतीवर आधारित वित्तपुरठा करण्याची योजना

7.लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी जमीन खरेदी करण्याकरीता योजना

8.कृषी पदवीधारक असल्यास त्यांना शेती क्लिनिक व कृषी व्यवसाय केंद्राची स्थापना करण्याकरीता आर्थिक मदत देण्याची योजना

9.फलोत्पादन वृक्षारोपण कार्य करीता कर्ज पुरवठा योजना

10. तसेच शेती यांत्रिकीकरण , पशुसंवर्धन , लघु सिंचन , हाय – टेक प्रोजेक्ट्स , पशुसंवर्धन शेतकरी व मत्स्यपालनास किसान क्रेडिट कार्ड , महाबँक किसान तात्काळ योजना , मालमत्ता खरेदी करण्यासाठी कर्ज योजना , सौर उर्जेवर आधारि पंपाकरीता कर्ज योजना , महा कृषी समृद्धी योजना

सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता व अधिक माहिती करिता https://bankofmaharashtra.in/ या संकेतस्थळावर क्लिक करावे .

Leave a Comment