Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ farm House Build Scheme For Farmer ] : शेतकऱ्यांना शेतांमध्ये फार्म हाऊस बांधणी करीता बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत कमी व्याजदरांमध्ये कर्ज पुरवठा करण्यात येते , या योजनांच्या माध्यमातुन कर्ज घेण्यासाठी आवश्यक पात्रता , उद्देश तसेच कर्जाची रक्कम , या संदर्भातील सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे घेवूयात ..

योजनचा उद्देश : शेतीच्या ठिकाणी शेतीची अवजारे , शेतीव्यवस्थापनाकरीता आवश्यक असणारे संचय तसेच इतर गरजांचीही काळजी घेता येईल . तसेच शेतांमध्ये शेतकऱ्यांना आरामाची व्यवस्था होईल , याकरीता शेतांमध्येच शेड , फार्म हाऊस बांधणीकरीता कर्जे उपलब्ध करुन दिले जाते .

या योजनांच्या माध्यमातुन कर्ज घेण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता : शेतकरी / शेती कामाशी संलग्न उपक्रमातील व्यक्ती यांमध्ये एकटे अथवा संयुक्तपणे लाभ घेता येईल . यांमध्ये 2.5 एकर जमिन सिंचित असणारे शेतकरी लाभ घेण्यास पात्र ठरतील . तसेच उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 65 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

कर्जाची रक्कम : यांमध्ये 2.5 एकर सिंचत शेतजमीन असणाऱ्यांना किमान 2 लाख रुपये ते 10 लाख रुपये पर्यंत कर्ज सुविधा देण्यात येते , तर 5 एकर जमीन असणाऱ्या शेतकरी / शेतमजुरांना 10 लाख रुपये ते 50 लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करुन दिले जाते . तर सदर कर्जावर शेतीविषयक प्रगतीवर लागु असलेला व्याजदर लागु असेल .

आवश्यक कागदपत्रे : या योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्यासाठी कर्ज आवेदन पत्र क्र.138 , 7/12 , 8 अ , चतु : सिमा , कोणतेही देय नसले बाबत प्रमाणपत्र , कोटेशन , मुल्यमापण प्रमाणत्र , हमीपत्र इ. कागतपत्रांची आवश्यक असेल .

लाभ कसा घ्याल : या योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्याकरीता आपल्या जवळ असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेस भेट देवून या योजनांच्या माध्यमातुन लाभ घेवू शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *