Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Family Pension Scheme ] : राज्य शासन सेवेत सलग एक वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन ( Family Pension ) योजना लागु करण्यात येते . त्याचबरोबर जर कर्मचारी हा निवृत्तीवेतन घेत असला तरी देखिल त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन ( Family Pension ) योजना लागु करण्यात येते .
कुटुंब निवृत्ती वेतन ( Family Pension ) योजनेचा लाभ घेण्याकरीता कर्मचारी हा अस्थायी असला तरी देखिल पात्र ठरतो , मात्र सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ घेण्याकरीता कर्मचारी हा स्थायी असणे आवश्यक असणार आहेत . कुटुंब निवृत्ती वेतन ( Family Pension ) ही मृत्युच्या दिवशी / निवृत्तीच्या दिवशी असलेल्या ( सेवानिवृत्ती वेतन घेणाऱ्यांसाठी ) अंतिम वेतनाच्या 30 टक्के इतके मुळ कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील देय महागाई भत्ता ( वाढीसह ) लागु करण्यात येतील .
तर दिनांक 01 जानेवारी 2006 रोजीच्या कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना किमान कुटुंब निवृत्ती वेतन 2282/- रुपये ( मुळ निवृत्ती वेतन ) तर दिनांक 01 जानेवारी 2006 नंतर मृत्यु झालेल्य कर्मचाऱ्यांचे वारसांना किमान कुटुंब निवृत्ती वेतन 1913/- रुपये अनुज्ञेय असेल सदर निर्धारण हे वित्त विभागाच्या दिनांक 13 फेब्रुवारी 2013 रोजी च्या निर्णयानुसार लागु करण्यात आलेला आहे .
तर कर्मचाऱ्याचा मृत्यु हा सात वर्षे सलग सेवा केल्यानंतर सेवेत असताना / सेवानिवृत्ती नंतर मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना मृत्युच्या दिनांक पासून 07 वर्षापर्यंत त्यांचे वय हे 65 वर्षे होईपर्यंत यामधील जो कालावधी कमी असेल तो पर्यंत वाढीव दराने म्हणजेच अंतिम वेतनाच्या 50 टक्के अथवा मंजूर सेवानिवृत्ती वेतनाच्या दराने कुटुंब निवृत्ती वेतन देय असेल . यालाच वाढीव दर असे म्हटले जाते .
दिनांक 01 जानेवारी 2006 पासून सेवेत असताना , मृत्यु झाल्यास वाढीव कुटुंब निवृत्ती वेतन सात ऐवजी 10 वर्षापर्यंत अनुज्ञेय करण्याात आलेला आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.