Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ fake fertilizers supply in Maharashtra ] : राज्यांमध्ये ओरिजन खताऐवजी केंद्र शासनांची मान्यता असणाऱ्या ग्रेड्सशची साम्स असणाऱ्या बनावट स्वरुपाचा खतांचा पुरवठा राज्यांमध्ये होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अशा कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याच्या कृषी विभागांकडून देण्यात आलेले आहेत .

केंद्र शासनांकडून मान्यता देण्यात आलेल्या ग्रेड्सशी साम्य असणाऱ्या बनावट स्वरुपाच्या खतांचा पुरवठा राज्यांमध्ये होत होते , अशा कंपन्यांविरोधात तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्य शासनांच्या कृषी विभागांकडून देण्यात आलेले आहेत . यात विशेष म्हणजे सदर बनावट खतांचा विक्री करणाऱ्या वितरक तसेच विक्रेते यांची नोंदणी केंद्र सरकारच्या रासायनिक खत मंत्रालयाच्या प्रणालीमध्ये करण्यात आलेली नसल्याचे दिसून आली आहे .

सदर कंपन्याने आययएफएमएस मार्फत नोंदणी करण्यात आलेली नाही , यामुळे सदर खतांवर संशय व्यक्त करण्यात आले व तपासाअंती बनावट खते असल्याचा निदर्शनास आले . शेतकऱ्यांची फसवणुक केल्याच्या आरोपावरुन अत्यावश्यक वस्तु कायदा 1955 व खत नियंत्रण आदेश 1985 मधील तरतुदींचा भंग केल्याबद्दल सदर कंपनी विरोधात फौजदार गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण कृषी आयुक्तालयामार्फत सांगण्यात आले आहेत .

सदर बनावट कंपन्या गुजरात राज्यातील : सदर बनावट खतांची निर्मिती करुन राज्यांमध्ये विक्री करत असणाऱ्या कंपन्या ह्या गुराज राज्यातील आहेत . सदर खतांमध्ये औद्योगिक कारखान्यांमधुन वापरण्यात येणाऱ्या टाकाऊ कचरा वापरुन रासायनिक खत म्हणून विक्री करत असल्याची धक्कादायक बाबत निदर्शनास आली आहे , यामुळे सदर कंपन्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नोंदणीकृत्त खतांची खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे . अशा बनावट स्वरुपाची खतांची विक्री होत असल्यास , प्रशासनांला कळविण्याचे सुचना देण्यात आलेले आहेत .

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *