Spread the love

लाईव्ह माराठी पेपर , संगीता पवार : वार्षिक अर्थसंकल्पामधील अविभाज्य भाग असलेल्या वार्षिक कार्यक्रम तयार करणे व वित्त विभागाला त्याबाबतची आकडेवारी उपलब्ध करणे यासंबंधीचे काम नियोजन विभागाकडून दरवर्षी साधारणतः ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत केले जाते . या कामाचे सांविधानिक महत्त्व व जबाबदारी तसेच हे काम विहित कालावधीमध्ये पूर्ण करण्याचे बंधन या सर्व गोष्टी विचारात घेऊन , संबंधित कामकाजामध्ये समाविष्ट कर्मचाऱ्यांना भत्ते मंजूर करणे संदर्भात राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून दिनांक 26 जुलै 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे ..

यानुसार 1) कार्या. 1411 , 14 12 व 1414 2)कार्यसन 1416 (विदर्भ ,मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळी अस्तित्वात नसल्याने विदर्भ मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र प्रदेश निहाय याबाबतचे प्रकाशन ) 3)जिल्हा वार्षिक कार्यक्रमाची संबंधित कार्या.1481 आणि 4) विकास क्षेत्रे कार्यसने इत्यादी मधील अधिकारी कर्मचारी यांना कराव्या लागणाऱ्या ज्यादा कामासाठी अतिरिक्त भत्ते अनुज्ञेय करण्यात येत आहेत ..

पदानुसार मंजूर करण्यात आलेल्या अतिरिक्त भत्त्याचा दर पुढील प्रमाणे आहे ..

भत्त्याचे दर सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पापासून अमलात येणार आहे . यासाठी ऑक्टोबर ते मार्च या सहा महिन्यांच्या कालावधीत अधिकारी / कर्मचारी यांची उपस्थिती किमान 75 टक्के असणे अनिवार्य असणार आहे . जर उपस्थिती 50 टक्के असेल तर त्यानुसार 50% रक्कम अनुज्ञेय असणार आहे . उपलब्ध रक्कम ही ठोक रकमेच्या स्वरूपात देण्यात येणार आहे ..

हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करणे संदर्भात , अधिवेशनामध्ये मोठा खुलासा !

सदर अधिकारी / कर्मचारी यांनी आपले काम समाधानकारकपणे पार पाडले आहे , अशा संबंधित कक्षाच्या प्रभारी सहसचिव / उपसचिव यांच्या प्रमाणपत्राच्या अधीन राहून सदर भत्ते मंजूर केले जाणार आहेत ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *