कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ; अतिरिक्त वेतनवाढ (Extra Payment) संदर्भात , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Extra Payment shasan paripatrak ] : अतिरिक्त वेतनवाढ संदर्भात राज्य शासनांच्या ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्यातील रायगड , सातारा , सांगली , ठाणे , पुणे , नंदुरबार , धुळे , धाराशिव , जालना , नांदेड , परभणी , लातुर , बीड , गोंदिया , चंद्रपुर , वर्धा , यवतमाळ , अकोला या जिल्हा परिषदा अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेतनवाढ संदर्भातील निर्णय घेण्यात आलेला आहे .

सदरच्या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्याच्या नंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याचे दिनांक 20.03.2024 व दि.14.05.2024 रोजीच्या स्मरणपत्रानुसार सदर परिपत्रक सादर करण्यात आलेला आहे .

यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्याच्या नंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ दिल्यास येणाऱ्या आर्थिक भाराबाबतची माहिती विहीत प्रपत्रात मागविण्यात आली आहे . तथापि सदर कार्यालयाची माहिती स्मरणपत्र पाठवून देखिल अप्राप्त असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

तसेच सदर प्रकरणी नमूद करण्यात येते कि , पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीची वेतनवाढ ही पदोन्नतीच्या दिनांकापासून देय करण्याबाबत मा.उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका दाखल करण्यात आलेली आहे . पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ देय करण्याच्या अनुषंगाने शासनांवर येणाऱ्या आर्थिक भाराबाबतची माहिती सादर करण्यास विलंब होत असल्याचे सादर करण्याचे स्मरण पत्र देण्यात आले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment