EVM तपासणी / विरोधात राज्यातील काही प्रमुख घडामोडी ; या गावात पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ EVM Checking various update ] : ईव्हीएम तपासणीसाठी तसेच विरोधात राज्यातील काही प्रमुख घडामोडी बाबत , राज्यातुन विविध प्रकारच्या घडामोडी घडत आहेत . यातील काही प्रमुख घडामोडी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

EVM तपासणीसाठी पठ्ठाने भरले 3 लाख रुपये : नागपुर जिल्ह्यातील दक्षिण नागपुर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार श्री.गिरीश पांडव यांनी 7 EVM व VVPAD पडताळणी करीता आवेदन सादर केले आहेत . याकरीता गिरीश पांडव यांनी तब्बल 3 लाख रुपये जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये जमा केले आहेत . त्याचबरोबर काँग्रेस पक्षांकडून ईव्हीएम विरोधात बाईक रॅली देखिल काढण्यात आली आहे .

EVM मशीनच्या आरोपामुळे उद्या पुन्हा मतदान : राज्यात महायुती पक्षांना एकतर्फी विजय मिळाल्याने , महाविकास पक्षांकडून , ईव्हीएम मशीन बाबत आक्षेप घेण्यात येत आहेत , अशातच माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावाने बॅलेट पेपरव मतदान घेण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे .

या गावाने स्वखर्चाने बॅलेट पेपर उपलब्ध करुन , माळशिरस तहसीलदार यांना सदर कामकाजासाठी सरकारी कर्मचारी मिळणेबाबत , पत्र सादर केले आहेत . याचे मुख्य कारण म्हणजेच सदर गावातील मतांचा कल हा महाविकास आघाडीला असुन देखिल , निकालांमध्ये महायुती पक्षाला गेल्याने , या संदर्भात गावाने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

या बाबत गावाने फलक लावून मतदान प्रक्रिया दि.03.12.2024 रोजी होणार असल्याचे जाहीर केले आहेत . या दिवशी सकाळी 7 ते दुपारी चार वाजे पर्यंत सदर मतदान प्रक्रिया पुर्ण होणार आहे , तर 4 वाजेनंतर लगेचच मतमोजणी प्रक्रिया पुर्ण होणार आहे . या मतदान प्रक्रिया साठी सरकारी कर्मचारी देणे शक्य नसल्याने , प्रसिद्धी माध्यमांकडून सदर मदान प्रक्रिया पुर्ण होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहेत .

तर राज्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव यांनी पुणे येथील फुले वाड्यात EVM विरोधात आंदोलन सुरु केले आहेत , यामुळे आता ईव्हीएम विरोधात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत .

Leave a Comment