Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ EPFO Rules change from new year ] : ईपीएफमधील नियमात नविन वर्षांपासून बदल होणार आहेत . या बदलांमूळे कर्मचारी / पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे , या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना नविन वर्षात पीएफ मध्ये मोठे बदल करण्यात येणार आहेत . यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना या सुधारित बदलांचा फायदा होणार आहे . पीएफचा फायदा निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत असतो . नविन वर्षात ईपीएफओ मार्फत कर्मचाऱ्यांना एटीएम कार्डची सुविधा देण्यात येणार आहे .
सध्य स्थितीत कर्मचाऱ्यांच्या मुळ पगाराच्या 12 टक्के रक्कम ही दर महिन्यांला ईपीएफ खात्यांमध्ये जमा करण्यात येत असते , तर नविन वर्षांपासून सदर रक्कम ही ईपीएफओने निश्चित केल्याच्या 15,000/- रुपये ऐवजी सरकारने त्यांच्या वास्तविक वेतनाप्रमाणे योगदान देण्याचा विचार केला जात आहे .
तर ईपीएफओ परव्याच्या वाढीकरीता पीएफ उत्पन्नाचा काही भाग / शेअर्स व इतर मालमत्तामधून पुन्हा गुंतवणुकीचा विचार करता येणार आहेत . याची अंमलबजावणी ही नविन आर्थिक वर्षांपासून करण्यता येणार आहे .
याशिवाय आता कर्मचारी पेन्शन सुधारणा नियमांनुसार कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन प्राप्त करुन शकता . याशिवाय नियोक्त्यांनी उच्च पेन्शन अर्जावर दिनांक 15.01.2025 पर्यंत विनंती करता येणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.