Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ EPFO NEW RULES CHANGE FOR WITHDRAWAL ] : पीएफ धारक सरकारी तसेच खाजगी कर्मचाऱ्यांसाठी मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे ती म्हणजे पीएफ खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे .
यापूर्वी पीएफ धारकांना एकाच वेळी पन्नास हजार रुपये काढण्याची मर्यादा होती परंतु आता सदर पीएफ खात्यातून एक लाख रुपये एकाच वेळी काढता येणार आहेत त्याचबरोबर नोकरीला लागल्यापासून सहा महिन्याच्या आत मध्ये देखील कर्मचाऱ्यांना आता पैसे काढता येणार आहेत सदरच्या बदलामुळे पीएफ धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे .
यापूर्वी सदर खात्यामधून केवळ 50000 ची मर्यादा असल्याने कर्मचाऱ्यांच्या गरजा पूर्ण होत नव्हत्या यामुळे सदर मर्यादा एक लाख पर्यंत वाढवण्यात आली आहे . पीएफ खात्यातून कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारण घर खरेदी घरबांधणी तसेच मुलांच्या शिक्षणाकरिता तसेच लग्नासाठी काढता येते .
त्याचबरोबर EPFO मार्फत कर्मचाऱ्यांना पैसे काढण्याची किचकट व्यवस्था दूर करून केवळ एका अर्जाच्या माध्यमातून पैसे काढता येणार आहेत , याकरिता कर्मचाऱ्यांना फॉर्म नंबर 31 भरून द्यावा लागेल ज्यामध्ये कोणते कारण आहे त्याबाबत प्रमाणपत्र जसे वैद्यकीय कारणासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र लग्न करण्यासाठी लग्नपत्रिका घर खरेदी करिता गरिबी खत अशा प्रकारचे कागदपत्र सदर फॉर्म सोबत जोडणे अनिवार्य असेल .
सदर निर्णयामुळे पीएफ धारकांना मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे कारण पैसे काढण्याची मर्यादा चक्क दुपटीने वाढविण्यात आली आहे .