Spread the love

live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ State Employee Transfer Update ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात आत्ताच्या घडीची मोठी अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली करिता दिनांक 06 डिसेंबर 2023 पर्यंत मुदत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून देण्यात आलेली होती , आता यात मुदतवाढ देण्यात आली आहे .

आंतरजिल्हा बदली करिता बदली पोर्टलवर ग्रामविकास विभागाकडून रिक्त जागांची संख्या उपलब्ध करणे आवश्यक होते , परंतु त्या संदर्भात ग्रामविकास विभागाकडून माहिती पोर्टलवर / शासन निर्णयाद्वारे उपलब्ध करून दिली नसल्याने ग्रामविकास विभागाकडून परत एकदा आंतरजिल्हा बदली करिता ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवर आवेदन करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे .

दिनांक 06 डिसेंबर 2023 पर्यंत राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांना अंतरजिल्हा बदली करिता रिक्त जागांची विवरण प्राप्त न झाल्याने दिनांक 15 डिसेंबर 2023 पर्यंत बदली पोर्टलवर आवेदन करण्यास ग्राम विकास विभागाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे . यामुळे जे शिक्षक बदली पात्र आहेत , अशांना आंतरजिल्हा बदली करिता आवेदन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे .

सदर बदली पोर्टलवर ग्रामविकास विभागाकडून जिल्हा निहाय रिक्त जागांचे संख्या नमूद करण्यात येईल जेणेकरून बदली पात्र शिक्षकांना आपल्या सोयीनुसार रिक्त जागेवर आवेदन सादर करता येणार आहेत . शिवाय सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने बदली प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे . यामुळे बदली पात्र शिक्षकांना आवेदन करण्यास पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *