Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : एकाच विभागांमध्ये पाच वर्षे पेक्षा अधिक काम केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदली होणार आहेत , या संदर्भात जिल्हा प्रशासनांच्या सामान्य प्रशासन विभागाकडून मोठी कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .सध्या राज्य कमऱ्यांच्या बदलीचे धोरण सुरु आहेत , यातच जिल्हा प्रशासनांकडून विभाग बदली बाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .

सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलाडी यांनी जिल्हा प्रशासनांमध्ये सुसुत्रता येण्यासाठी एकाच विभागातुन दुसऱ्या विभागात बदली करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . सध्या जिल्हा परिषद सातारा अंतर्गत एकाच विभागात बऱ्याच वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे निदर्शनास आल्याने , त्याचबरोबर कामांमध्ये सुसुत्रता येण्यासाठी जिल्हा प्रशासनांकडून दुसऱ्या विभागात बदली करणेबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .

त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.ज्ञानेश्वर खिलारी यांनी जिल्हा प्रशासनांमध्ये अधिक सुसुत्रता व बदली प्रक्रियामध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी बदली प्रक्रियांमध्ये असणाऱ्या त्रुटी दुर करुन पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला आहे .सातारा जिल्हा प्रशासनांमध्ये गेल्याच आठवड्यात प्रशासकीय व विनंती व आपसी बदल्यांची प्रक्रिया पुर्ण झालेली आहे .आता एकाच विभांगामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विभागात बदली देण्यात येणार आहेत .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची तारीख झाली निश्चित !

जिल्हा परिषदे हे एक मिनि मंत्रालय म्हणून ओळखण्यात येत असते , एका विभागांत सलग पाच वर्षे पेक्षा अधिक वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित विभागातील संपुर्ण माहीती होते , जर सदर कर्मचाऱ्यांस दुसऱ्या विभागात बदली दिल्यास निश्चित काही काळ कामांमध्ये विस्कळीतपणा येण्याची शक्यता आहे , याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.ज्ञानेश्वर खिलारी कशाप्रकारचे नियोजन करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत .

आपण जर शासकीय , निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *