Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ employee transfer shasan paripatrak ] : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपुर्व जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्याबाबत , शिक्षण विभाग ( प्राथमिक ) जिल्हा परिषद परभरण यांच्यामार्फत दिनांक 25 जुन 2024 रोजी राज्या शासनांच्या तसेच विविध शिक्षक संघटनांच्या निवेदनानुसार महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .

सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहे कि , जिल्हा अंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पुर्वीपासून कार्यरत आहेत , त्यांच्यापैकी इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देवून जागा रिक्त असल्यास , समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहेत . तसेच समुपदेशनापुर्वी संभाव्य भरण्यात येणारी नविन पदे विचारात घ्यावेत व शाळास्तरावर समान शिक्षक राहतील याची दक्षता घेण्याचे निर्देश नमुद करण्यात आले आहेत .

तसेच शिक्षकांच्या विनंती बदली प्रक्रियेसाठी ग्रामविकास विभागाच्या दिनांक 07.04.2021 रोजीच्या शासन निर्णयातील नमुद केलेल्या विनंती बदली कालावधी पुर्ण करत असलेल्या विनंती बदलीसाठी इच्छुक शिक्षकांचे विनंती बदलीचे अर्ज सबळ पुराव्यानिशी कार्यालयात दिनांक 26 जुन 2024 पर्यंत सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत स्विकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच संच मान्यता सन 2022-23 मध्ये तालुकास्तर / जिल्हा स्तरावरील समायोजन प्रक्रिया रद्द झाल्याने , समायोजन प्रक्रियेतील बदली इच्छुक शिक्षकांचे विनंती बदली अर्ज स्विकारुन एकत्रित माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या सर्व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहेत .

तसेच विहीत मुदतीमध्ये आलेले अर्ज संबंधित गटशिक्षणाधिकारी  यांनी एकत्रित माहिती तयार करुन दिनांक 26 जुन 2024 रोजी सायंकाळी 6.00 वाजता प्रस्तुत कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *