Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Transfer Shasan Paripatrak ] : जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रकिया सन 2022 मध्ये विशेष संवर्ग भाग – 1 चा घेतलेल्या शिक्षकांची तपासणी करुन अहवाल मिळणेबाबत तसेच दिव्यांग प्रमाणपत्र साशंक वाटप असल्यामुळे शिक्षकांची तपासणी करुन अहवाल देणेबाबत जिल्हा परिषद जालना मार्फत जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत .

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेले असून , सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार शासन स्तरावील शिक्षकांनी भरलेल्या माहितीचे आधारे जिल्हांतर्गत बदली सन 2022 ची प्रक्रिया पुर्ण करण्यात आलेली आहे . सदर पत्रांमध्ये नमुद संदर्भिय निवेदन व तक्रार प्राप्त शिक्षकांची प्रमाणपत्र सादर करुन बदली करुन घेतलेली असून संबंधित शिक्षकांचे दिव्यांग / आजाराबाबत , व कागदपत्राची पडताळणी करुन जाणीवपुर्वक खोटी माहिती भरलेल्या शिक्षकांविरुद्ध कारवाई करणेबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत .

यानुसार निवेदन / तक्रार प्राप्त संबंधित दिव्यांग शिक्षकांचे दिव्यांगत्वाचा प्रकार व टक्केवारी या बाबत तपासणीकरीता सन ज.जी . समुह रुग्णालय , मुंबई येथे दिनांक व वेळ निश्चित करणेबाबत कळविण्यात होते , यानुसार संबंधित शिक्षकांना दिनांक व वेळ निश्चित करणेसाठी सर जे.जी समूह रुग्णालय , मुंबई येथील प्रशासकीय भवन इमारत येथील कार्यालयाशी संपर्क साधण्यास यावेते असे सुचित करण्यात आलेले आहेत .

मा . उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे संबंधित शिक्षकांची पाल्याची / जोडीदारांची तपासणी व कागदपत्रांची पडताळणी करु नये याबाबत विविध रिट याचिका दाखल असून सदर प्रकरणात मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी शिक्षकांचे दिव्यांग / आजाराबाबत व कागदपत्राची पडताळणी करु नये याबाबत स्थगिती देण्यात आलेली असून , अपिकर्ते यांना मा. उच्च न्यायाल मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचे पुढील आदेशापर्यंत शिक्षकांची दिव्यांग  / आजाराबाबत व कागदपत्राची पडताळणीतून वगळण्यात येत आहेत .

या संदर्भातील जिल्हा परिषद जालना यांच्यामार्फत दिनांक 01 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *