Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Transfer New Shasan Paripatrak ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या सर्व साधारण बदली प्रक्रिया 2024 बाबत अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक जिल्हा प्रशासन विभाग कोल्हापुर मार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्रकानुसार , जिल्हा परिषदेकडील संवर्ग 3 व 4 मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे धोरण ग्राम विकास विभागाच्या दिनांक 15.05.2014 नुसार निश्चित करण्यात आलेले आहेत . सदल बदल्यांचे वेळापत्रकही निश्चित करुन देण्यात आलेले आहेत . सदर वेळापत्रांप्रमाणे बदल्यांची कार्यवाही करणे बंधनकारक असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
यानुसार प्रशासकीय तसेच विनंती बदल्यांची कार्यवाही दिनांक 31 मे पर्यंत होणे आवश्यक असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . तसेच प्रशासकीय बदल्यांचे धोरणानुसार कर्मचाऱ्यांची त्या कैंलेंडर वर्षाच्या दि.31 मे पर्यंत झालेली सलग सेवा विचारात घेवून किमान 10 वर्षे अशी सलग सेवा झालेले कर्मचारी जिल्हास्तरीय प्रशासकीय बदली करीता पात्र ठरणार आहेत . तर प्रशासकीय बदल्यांसाठीची टक्केवारी 10 टक्के इतकी निश्चित करण्यात आलेली आहे .
यामुळे निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्राकानुसार कार्यवाही होण्याकरीता , माहिती वेळेत प्राप्त होणे आवश्यक असल्याने , कोल्हापुर जिल्हा प्रशासनाच्या अधिनस्त सर्व कार्यालयांमधील , एकाच मुख्यालयात सलग दहा वर्षे सेवा झालेले वर्ग – 3 च्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती पाठविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
यांमध्ये प्राधान्य क्रमाने करावयाच्या विनंती बदल्यांबाबत , राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडील दिनांक 07.03.2019 रोजीच्या पुरक पत्रानुसार , शासनाने किमान 05 वर्षा ऐवजी किमान 03 वर्षे सलग सेवा असा बदल करण्यात आलेला आहे . ही बाब कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून , अट पुर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विनंती अर्ज स्विकारण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील जिल्हा प्रशासन विभाग कोल्हापुर यांच्याकडून दि.14.02.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.