Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ employee transfer one increament shasan nirnay & paripatrak ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदलीनंतर 01 आगाऊ वेतनवाढ मंजूर करणेबाबत , राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दिनांक 03 ऑक्टोंबर 2003 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय व दिनांक 05.09.2023 रोजी याबाबत माहितीच्या अधिकारातील माहितीनुसार याबाबत सविस्तर माहिती विशद करण्यात आलेली आहे .

महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत वर्ग – 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढी देणेबाबतचे सर्व समावेशक आदेश ग्राम विकास विभागांकडून दिनांक 31.10.1989 रोजीच्या शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात आले आहेत . तसेच त्यात आंतर जिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यांस आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी अथवा कसे याबाबतचा सविस्तर उल्लेख नाही .

दरम्यान अशा आंतर जिल्हा बदलीने ( Transfer ) दुसऱ्या एखाद्या जिल्हा परिषदेत बदलून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता 2 ऱ्या जिल्हा परिषदेत शुन्य होते असे सर्व जिल्हा परिषदांना ग्राम विकास विभागाच्या दिनांक 31 जुलै 1997 च्या शासन पत्रानुसार कळविण्यात आलेले आहेत , तर अशा कर्मचाऱ्यांस आगाऊ वेतन वाढ द्यावी अथवा कसे ही बाब राज्य शासनांच्या विराधीन होती , अशा स्थितीमध्ये आंतर जिल्हा बदलीने बदलून आलेल्या अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे ..

एक वेतनवाढीकरीता विचार केल्यास , ग्राम विकास विभागाच्या दिनांक 31.10.1989 च्या शासन आदेशानुसार , जुन्या व नविन जिल्हा परिषदेतील संबंधित कर्मचाऱ्यांची एकाच पदावरील सलग किामन 3 वर्षे सेवा झालेली असणे आवश्यक असेल . त्याचबरोबर संबंधित कर्मचाऱ्यांच्या जिल्हा परिषदेकडील गोपनिय अभिलेख्यांची प्रतवारी दिनांक 31 ऑक्टोंबर 1989 च्या शासन आदेशानुसार असावी असे , नमुद करण्यात आलेली आहे .

या संदर्भातील GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

याबाबत माहितीच्या अधिकारांमध्ये विचारलेल्या अनुषंगाने ग्राम विकास विभागांकडून दि.05.09.2023 रोजी निर्गमित शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *