Spread the love

Live Marathipepar सविता पवार , प्रतिनिधी [ Government Employee Three Big Benefit ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर तीन मोठे महत्वपुर्ण निर्णय घेतले जाणार आहेत , ज्यांमुळे एकुण पगारात मोठी वाढ होणार आहे , यांमध्ये वाढीव घरभाडे भत्ता , वाहन भत्ता तसेच जुनी पेन्शनचा समावेश असणार आहे .

घरभाडे भत्ता : महागाई भत्ता 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्ता मध्ये वाढ अपेक्षित आहे , सध्या कर्मचाऱ्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार 27 टक्के , 18 टक्के , 9 टक्के घरभाडे देण्यात येतात , आता डी.ए 50 टक्के पार केल्यास घरभाडे भत्ताचे सुधारित दर हे 30 टक्के , 20 टक्के , 10 टक्के असे होणार आहेत .

वाहन भत्ता : घरभाडे भत्ता वाढीनंतर वाहन भत्ता मध्ये देखिल वाढ होते , वाहन भत्ता हे वेतनश्रेणीनुसार लागु करण्यात येते सध्या माहे एप्रिल 2022 पासून एस 01 ते एस 06 पर्यंत वेतनश्रेणी असणाऱ्यांना 675 रुपये तर एस 07 ते एस 19 पर्यंतच्या वेतनश्रेणींमध्ये वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1350/- रुपये वाहन भत्ता देण्यात येतो . तर एस 20 व त्यावरील वेतनश्रेणी असणाऱ्यांना 2700/- रुपये वाहन भत्ता अदा करण्यात येतो .

तर बृहन्मुंबई नागरी समुह , नागरी नागरी समुह व पुणे नागरी समुह येथे कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांना एस 01 ते एस 06 पर्यंत वेतनश्रेणी असणाऱ्यांना 1000/- रुपये तर एस 07 ते एस 19 पर्यंतच्या वेतनश्रेणींमध्ये वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना 2700/- रुपये वाहन भत्ता देण्यात येतो .तर एस 20 व त्यावरील वेतनश्रेणी असणाऱ्यांना 5400/- रुपये वाहन भत्ता अदा करण्यात येतो . घरभाडे भत्ता मध्ये वाढ लागु केल्यानंतर वाहन भत्ता मध्ये देखिल सध्या देण्यात येत असणाऱ्या भत्ताच्या पुढील टप्पा अदा करण्यात येईल .

जुनी पेन्शन योजना : दिनांक 01 नोव्हेंबर 2005 नंतर राज्य शासन सेवेत रुजु होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनांप्रमाणे पेन्शन लाभ अदा करण्यात येणार आहेत . याकरीता आगामी हिवाळी अधिवेशांमध्ये पेन्शन बाबत अभ्यास करणाऱ्या समितीचा अहवाल सादर करण्यात येणार आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *