कर्मचारी शासन निर्णय : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Payment Shasan Nirnay ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे , सदर शासन निर्णयानुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधीचे वितरण करण्यात आलेले आहेत .

जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजना वरील रुपांतरीत नियमित अस्थायी आस्थापनेवर कार्यरत पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरीता शासनांकडून जिल्हा परिषदेला अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय मंत्रीमंडळाने दिनांक 17 नोव्हेंबर 2022 च्या बैठकीमध्ये घेतला असून त्या अनुषंगाने दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनासाठी संबंधित जिल्हा परिषदांना संदर्भाधिन शासन निर्णयानुसार 15.32 कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमुद जिल्हा परिषदांनी आतापर्यंत केलेला खर्च विचारात घेवून कार्यरत कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनाकरीता जिल्हा परिषदांना पुढील निधी वितरीत करण्याची बाबत राज्य शासनांच्या विचाराधीन आहे .

सदर शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेमधील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या रुपांतरित नियमित अस्थायी आस्थापनेवरील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सन 2023-24 या आर्थिक वर्षातील नियमित वेतनासाठी पुढील जिल्हा परिषदांना 22151914 या लेखाशिर्षांतर्गत 36 सहायक अनुदाने ( वेतन ) या उद्दीष्टाखाली एकुण रुपये 1,51,00,000/- रुपये इतके अनुदान वितरीत करण्यात येत आहेत .

जिल्हा परिषद निहाय कर्मचाऱ्यांची संख्या व वितरीत रक्कम याबाब सविस्तर विवरण पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

सदर अनुदानातुन ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करावयाचे आहेत , अशा कर्मचाऱ्यांची नावे सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत , सन 2023-24 या आर्थिक वर्षातील वेतन / भत्यासाठी सदरची निधी वितरीत करण्यात येत असून , त्यापुर्वीचे वेतन प्रलंबित असल्यास , सदर अनुदानातुन ते अदा करु नयेत तसेच दिनांक 30.01.2023 च्या शासन निर्णयांमध्ये नमुद केलेल्या पदनामानुसार , संबंधित कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय होणाऱ्या वेतनश्रेणीप्रमाणे वेतन अदा करण्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांकडून दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment