Live Marathipepra संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Service Benifit Shasan Paripatrak ] : महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांना नियुक्तीच्या दिनांकापासून सेवेचे लाभ मिळणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांच्या मार्फत दिनांक 02 नोव्हेंबर 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
मा.श्री श्रीकांत गोंविदराव देशपांडे माजी विधान परिषद सदस्य यांचे दिनांक 10 ऑक्टोंबर 2023 रोजीच्या संदर्भाधिन पत्रानुसार सदर शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत . या परिपत्रकांनुसार राज्यातील अप्रशिक्षित शिक्षकांना नियुक्तीच्या दिनांकापासूनच सेवेचे लाभ मिळणेबाबत सुचना निर्गमित करण्यात आलेले आहेत .
यामध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , मा.श्रीकांत देशपांडे माजी विधानपरिषद सदस्य यांनी संदर्भाकित पत्रात नमुद केल्याप्रमाणे राज्यात पुर्वी मागास प्रवर्गाचे प्रशिक्षित उमेदवार मिळत नसल्यामुळे अप्रशिक्षित शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत . सेवेत असतांना ते प्रशिक्षित झाले आहेत .
त्यांना त्यावेळी अप्रशिक्षित वेतन श्रेणी अदा करण्यात येत होती , त्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून निवड व वरिष्ठ श्रेणीसाठी नियुक्ती दिनांक ग्राह्य धरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्ती असल्यामुळे जुनी पेन्शन योजना लागु करणे तसेच इतर सेवा विषयक लाभ अनुज्ञेय करण्याचे निर्देश सदर शासन परिपत्रकान्वये देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 02 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.