Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Samayojana , transfer , Pramotion imp paripatrak ] : आता नविन शैक्षणिक वर्ष येत्या 13 जुन पासून सुरु होत असल्याने , कर्मचाऱ्यांचे समायोजन , पदोन्नती , बदल्या तसेच नियुक्यांची मोठी लगभग सुरु झाली आहे , याबाबत जिल्हा परिषद कोल्हापुर मार्फत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .
प्राथमिक शिक्षकांचे समायोजन , पदोन्नती , बदल्या व नियुक्त्यांचे संभाव्य वेळापत्रक बाबत मा.मुख्य कार्यकारी जि.परिषद कोल्हापुर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24.05.2024 रोजी झालेल्या बैठकीनुसार संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत .
सदरच्या परिपत्रकानुसार , सन 2024 मध्ये प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्नाबाबत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापुर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24 मे 2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती . त्यांमध्ये अतिरिक्त शिक्षक यांचे समायेाजन , मुख्याध्यापक पदोन्नती , जिल्हांतर्गत बदली , आंतरजिल्हा बदली शिक्षकांना पदस्थापना देणे , पवित्र पोर्टलद्वारे हजर झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देणे इ. बाबीकरीता वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहेत .
यांमध्ये मुख्याध्यापक पदोन्नतीच्या यादीवरील हरकती घेण्याची अंतिम तारीख ही 27 मे 2024 अशी असणार आहे , तर रिक्त पदांची यादीवर हरकती घेणेची अंतिम तारीख ही 28 मे 2024 अशी असणार आहे . तसेच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी 30 मे 2024 पर्यंत अंतिम दिनांक असणार आहे .
या संदर्भात कोल्हापुर जिल्हा परिषद मार्फत निर्गमित करण्यात आलेले सविस्तर संभाव्य वेळापत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .