राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांचे समायोजन करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.16 मे 2023

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर जिल्हा परिष्द शिक्षकांनी दिलेल्या विकल्पाच्या विपरीत ठाणे / पालघर जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांचे त्यांनी दिलेल्या विकल्पाच्या जिल्ह्यात समायोजन करणेबाबत ग्राम विकास विभागांकडून दि.16 मे 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

ठाणे / पालघर जिल्हा परिषदेमध्ये विकल्प विपरीत कार्यरत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील 218 ( तसेच सदर आकडेवारीत शिक्षकांची बदली / पदोन्नती / सेवानिवृत्ती या कारणामुळे बदल झालेला असल्यास ती संख्या विचारात घेण्यात येईल ) शिक्षकांच्या सेवा मुळ ठाणे / पालघर जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याबाबत दि.29.02.2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

समायोजन कार्यवाही करताना विकल्प विपरीत कार्यरत असलेल्या ज्या शिक्षकांना दि.31.07.2017 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार दि.10.08.2017 पर्यंत दिलेले विकल्प बदलावयाचे असतील , त्यांनी सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसात विहीत नमुन्यातील सुधारित विकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

सदर सुट ही ज्या शिक्षकांचे विकल्प विपरीत म्हणून ठाणे / पालघर जिल्ह्यात समायोजन झाले आहे , त्यांनाच लागु असणार आहे .यामध्ये ज्या शिक्षकांनी नमूद (दिलेल्या ) विकल्पा नुसार , पालघर किंवा ठाणे या जिल्ह्यामध्ये समायोजन झालेले आहे , अशा कर्मचाऱ्यांना आता विकल्प मध्ये बदल करण्याची संधी उपलब्ध होणार आहे .

तसेच सदर शिक्षकांची समायोजनची कार्यवाही ही सन 2016 मध्ये नमूद बिंदूनामावली नुसार नवनिर्मित पालघर जिल्हा परिषद ( ZP ) कडे समायोजन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदर बिंदुनामावली प्रमाण मानून शासन निर्णयातील अटी व शर्तींचे पालन करुन पालघर जिल्हा परिषदेमधील विकल्प विपरीत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांचे त्यांनी दिलेल्या विकल्पाच्या जिल्ह्यात समायोजन करण्यास मान्यता देण्यात येत आहे .

सदर समायोजन संदर्भातील ग्राम विकास विभागांकडून दि.16 मे 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

शासन निर्णय

शासकीय कर्मचारी विषयक , सरकारी नोकरी भरती विषयक व इतर घडामोंडीच्या अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment