Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Retirement Before Retirement Age Shasan Nirnay ] : वयाच्या 50/55 व्या वर्षापलीकडे / अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर शासकीय सेवा पुनर्विलोकन करणेबाबत , राज्य शासनांच्या सार्वजन‍िक आरोग्य विभागांकडून दिनांक 08 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1982 च्या नियम 10 ( 4 ) नुसार व नियम 64 नुसार सार्वजन‍िक हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी / कर्मचारी यांना वयाच्या 50/55 व्या वर्षापलीकडे / अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर , यापैकी जे अगोदर घडेल तेव्हा सेवेत राहण्याची पात्रापात्रता आजमाविण्याच्या दृष्टीने त्यांच्या सेवेचे पुनर्विलोकन करुन सुयोग्य व कार्यक्षम अधिकारी / कर्मचारी यांना शासन सेवेतुन मुदतपुर्व सेवानिवृत्त करावे असे शासनाचे धोरण आहे .

त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 10 जुन 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार सेवापुनर्विलोकना संबंधी कार्यपद्धती व सर्वसाधारण सुचना विहीत करण्यात आलेले आहेत . त्यास अनुसरुन सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सेवा पुनर्विलोकना करीता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 24 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयनुसार अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव ( आरोग्य विभाग ) यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय पुनर्विलोकन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे .

सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या वयाच्या 50/55 व्या वर्षापलीकडे / अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी त्यांच्या सेवा पुनर्विलोकन समितीच्या मान्यतेकरीता चक्रीय पद्धतीने सादर करण्यात येतील . विभागीय पुनर्विलोकन समितीने सदर अधिकाऱ्यांच्या सेवेचे मुल्यमापन करुन केलेल्या शिफारीशनुसार , ज्या अधिकाऱ्यांना वयाच्या 50/55 व्या वर्षापलीकडे / अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी सेवेत राहण्यासाठी पात्र ठरविले आहेत . त्यास मान्यता देण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती ,  या संदर्भात पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहेत .

विभागीय पुनर्विलोकन समितीच्या चक्रीय पद्धतीने मान्यता दिलेल्या शिफारशीस अनुसरुन सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ब या संवर्गातील शासन निर्णयातील नमुद अधिकाऱ्यांच्या सेवा त्यांच्या वयाच्या 50/55 व्‍या वर्षापलीकडे / अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर या पैकी जे अगोदर घडेल त्यानंतर चालु ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे .

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *