Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Retirement Age Reduce Shasan Nirnay ] : कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वयांमध्ये बदल करणे बाबत राज्य शासनांच्या कृषी , पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागांकडून दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
कृषी व पदुम विभागाच्या दिनांक 04 एप्रिल 2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील कृषी विद्यापीठामधील सहाय्यक प्राध्यापक , सहयोगी प्राध्यापक , प्राध्यापक अधिष्ठाता आणि संचालक दर्जामधील अध्यापक यांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 60 वर्षावरुन 62 वर्षे करण्यात आलेली आहे . तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक 12.07.2016 नुसार राज्यातील अकृषी विद्यापीठे / शासकीय /अशासकीय अनुदानित महाविद्यालये / शासकीय तंत्र महाविद्यालये / पदवी संस्था या राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीचे वय हे 62 वर्षे वयावरुन 60 वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .
मा.सर्वोच्च न्यायालयाच्या अपिल क्र.5527-5547/2013 यांमध्ये सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादे मध्ये निर्णय घेण्याचे अधिकार राज्य शासनाला असणार आहेत . असा निर्णय दिलेला आहे . सद्य : स्थितीमध्ये राज्य शासन सेवेतील कृषी विद्यापीठातील शिक्षक वर्गीय पदांसाठी पात्रताधारक उमेदवार उपलब्ध आहेत , व त्यांना संधी देवून कार्यक्षम मनुष्यबळाची निर्मिती करणे आवश्यक आहे .याकरीता दिनांक 04 एप्रिल 2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे वयावरुन 62 वर्षे वाढ करणेबाबत घेण्यात आलेला निर्णयाचा फेरविचार करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती .
सदरच्या शासन निर्णयानुसार राज्य शासन सेवेतील कृषी विद्यापीठ मधील आणि संलग्नित तसेच अनुदानित महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक , सहयोगी प्राध्यापक , प्राध्यापक , विभागप्रमुख , सहयोगी अधिष्ठाता , शारिरीक शिक्षण निदेशक , क्रिडा अधिकारी , ग्रंथपाल , अधिष्ठाता आणि संचालक दर्जातील अध्यापकांची नियम वयोमानानुसार सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 62 वर्षे वयावरुन 60 वर्षे करण्यात येत आहेत .
आता परिणामी असे सर्व अध्यापकीय कर्मचारी ज्या महिन्यांत वयांने 60 वर्षांचे होतील , त्या महिन्याच्या अखेरच्या दिवशी मध्यान्नोत्तर सेवेतून निवृत्त होतील , आणि ज्या अध्यापकीय कर्मचाऱ्यांची जन्मतारीख महिन्याच्या एक तारखेला असेल ते अध्यापकीय कर्मचारी 60 वर्षे वयाचे होताच मागील महिन्याच्या शेवटच्या दिवशी मध्यान्नोत्तर सेवानिवृत्त होतील .
राज्य शासनांच्या कृषी व पदुम विभागाच्या दिनांक 04 एप्रिल 2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार ज्या अध्यापकीय कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती वयोमर्यादा 60 वर्षावरुन 62 वर्ष केलेल्या निर्णयाचा लाभ घेतलेले आहेत , असे 60 वर्षावरील अध्यापकीय कर्मचारी , वयाची 62 वर्षे पुर्ण होताच सेवानिवृत्ती होतील असा निर्णय देण्यात आलेला आहे .
या संदर्भातील कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 20.02.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.