Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयांमध्ये दोन वर्षांची वाढ केली असता देशांमधील तब्बल 25 घटक राज्यांनी राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयांमध्ये 02 वर्षांची वाढ करण्यात आलेली आहे . त्याच धर्तीवर आता महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचारी सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये दोन वर्षांची वाढ करणेबाबत राज्य शासनांकडे मागणी करत आहेत .

अशातच आता सरकारने मोठा निर्णय घेण्यात आला आहे , तो म्हणजे सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये चक्क 03 वर्षांने वाढविली आहे . ज्यामुळे कर्मचाऱ्यांना आता अतिरिक्त 03 वर्षे शासन सेवेचा लाभ मिळणार आहे . या संदर्भात जम्मू आणि काशिर प्रशासनांकडून ,सेवानिवृत्तीचे वय वाढविणे निर्णय घेण्यात आला आहे .

यांमध्ये जन्मु आणि कश्मिर प्रशासनांमधील प्राध्यापकांच्या मागणीनुसार , सेवानिवृत्तीचे वयांमध्ये तीन वर्षांची वाढ करण्यात आली आहे .यापुर्वी सदर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे होते , तर आता यांमध्ये तीन वर्षांची वाढ करण्यात आल्याने , सेवानिवृत्तीचे वय हे 65 वर्षे झालेले आहेत . प्राध्यापक वर्गांना शिक्षण घेण्यासाठीच 40 वर्षे उलटुन जातात , यामुळे प्राध्यापकांचे सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करणे साहजिकच योग्य आहे .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आंदोलनास यश ,शासनांकडून विविध पेन्शन लाभ लागु करणेबाबत परिपत्रक निर्गमित ! दि.18.07.2023

प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ केली असता , आता जम्मु कश्मिर मधील डॉक्टर असोसिएशनकडून डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये प्राध्यापकांप्रमाणे 65 वर्षे करण्याची मागणी केली आहे , यावरही जम्मु कश्मिर प्रशासनांकडून सकारात्मक चर्चा सुरु आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर , Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *