Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ employee related imp shasan nirnay ] : कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , व्याजप्रदाने , अल्पबचत , भविष्य निर्वाह निधी इ. वरील व्याज , राज्य भविष्य निर्वाह निधीवरील व्याज , भारित , विदर्भ गृहनिर्माण मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या अंशदायी भविष्य निर्वाह निधीवरील व्याज , व्याज या लेखाशिर्षाखाली वित्तीय वर्ष 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता रुपये 1,73,69,000/- इतकी अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आलेली आहे .
वित्त विभाग मार्फत सदर एकुण 1,73,69,000/- इतका निधी वितरीत करण्यात आला आहे . वित्तीय वर्ष 2024-25 करीता खर्चासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली रुपये 1,73,69,000/- इतकी रक्कम पुस्तकी समायोजनाने म्हाडास उपलब्ध करुन देण्यात येत आहे .
तसेच वित्त नियंत्रक , महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण यांनी उपलब्ध प्राप्त तरतुदीमधून अत्यंत आवश्यक व अनिवार्य खर्च करण्याचे तसेच मंजूर अनुदानापेक्षा सदर खर्च जास्त होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच सदर बाबीवर होणारा खर्च हा सन 2024-25 या वर्षाच्या मंजूर अनुदानातुन भागविण्याचे निर्देश आहेत . या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय खालील प्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.