Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ employee pramotion shasan paripatrak ] : कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात राज्य शासनांच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 11 जुन 2024 रोजी राज्याच्या सर्व मुख्य कार्यकाऱ्यांच्या प्रति महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्य शासनांच्या दिनांक 27.09.2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार तसेच शासनांच्या दिनांक 24 .05.2024 रोजीच्या शासन पत्रानुसार राज्यतील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविण्यात येते की , केंद्रप्रमुख या पदावरील पदोन्नतीकरीता , जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( प्राथमिक ) या पदावर किमान दहा वर्ष अखंडीत सेवा पुर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून सेवाज्येष्ठता …

व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांची पदोन्नतीने नेमणुक करण्यात येईल , अशी संदर्भिय शासन निर्णय दि.27.09.2023 नुसार तरतुद विहित करण्यात आलेली आहे . यास्तव केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीकरीता सेवा ज्येष्ठता यादी तयार करताना सहायक शिक्षकांची प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( प्राथमिक ) या पदावर झालेली नियुक्ती दिनांक विचारात घेणे आवश्यक असणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

परंतु या अनुषंगाने जिल्हा परिषद स्तरावर कार्यवाही होत नसलेबाबत , संचालनालय स्तरावर तक्रारी प्राप्त होत असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत , तरी याबाबत शासन निर्णय परिषद स्तरावर कार्यवाही होत नसलेबाबत संचालनालय स्तरावर तक्रारी प्राप्त होत आहेत , तरी याबाबत शासन निर्णय दिनांक 27.09.2023 मधील तरतुदीनुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करण्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

या संदर्भात शिक्षण संचालनालय ( प्राथमिक ) मार्फत दिनांक 11.06.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *