Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Pension Scheme High Court Nirnay ] : कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना बाबत उच्च न्यायालयाने मोठा महत्वपुर्ण दिलासादायक निर्णय दिला आहे , शिवाय शिक्षण अधिकाऱ्याला मा.न्यायालयाच्या अवमानतेची नोटीसय देखिल देण्यात आलेली आहे .
दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी राज्य शासन सेवेत ज्यांनी पार्ट टाईम ( अर्धवेळ ) म्हणून नियुक्ती देण्यात आलेली असेल असे कर्मचारी हे पेन्शन करीता पात्र असणार आहेत , असा महत्वपुर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे . शिवाय या आदेशाचे पालन न करणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्याला उच्च न्यायालयाने मंगळवारी मा.न्यायालयाच्या अवमानतेची नोटीस देखिल बजावण्यात आलेली आहे .
न्यायमुर्ती नितीन जामदार व न्यायमुर्ती मिलिंद साठये यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली असून , यांमध्ये दि.01 नोव्हेंबर 2005 च्या अगोदर पार्ट टाईम ( अधर्ववेळ ) म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे , असे कर्मचारी जुनी पेन्शन करीता पात्र ठरेल असा निकाल देण्यात आलेला आहे . या निकालास राज्य शासनांकडून आव्हान देण्यात आलेले होते , परंतु सदर आदेश शासनास बंधनकार असणार असल्याचे नमुद केल्याने जिल्हा सांगली येथील शिक्षण अधिकारी श्री.राजेसाहेब लोंढे यांनी जुनी पेन्शनचा लाभ देण्यास नकार का दिला याकरीता सदर शिक्षण अधिकाऱ्यास न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस देण्यात आलेली आहे .
सदर शिक्षण अधिकाऱ्यास इंग्रजी समजत नाही का ? असे न्यायालयाने सुनावले आहेत , यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहे कि , कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही नोव्हेंबर 2005 अगोदर पार्ट टाईम म्हणून नियुक्ती ही 100 टक्के अनुदानित पदावर असली तरी सदर कर्मचारी हा जुन्या पेन्शनकरीता पात्र ठरता असे स्पष्टीकरण सदर निकालांमध्ये देण्यात आलेले आहेत , शिवाय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव यांनी शिक्षण अधिकारी लोंढे यांच्यावर कारवाई करण्याचे नोटीसांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
काय आहे प्रकरण : सांगली जिल्ह्यातील 100 टक्के अनुदानित माध्यमिक शाळेंमध्ये अर्धवेळ म्हणून ग्रंथपाल म्हणून दिनांक 01.11.2005 पुर्वी नियुक्ती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्यास नकार दिला होता , यामुळे सदर कर्मचाऱ्यांनी न्यायालयांमध्ये धाव घेतली घेतली होती , यांमध्ये न्यायालयाने वरीलप्रमाणे निकाल दिला आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.