Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : माहे जुन चे सवलतमुल्याच्या प्रतिपुर्तीपोटी निधी उपलब्ध करण्याबाबत , राज्य शासनांकडून रुप्ये 334.52 कोटी इतका निधी मंजुर करण्यात आलेला आहे . यामुळे सदर कर्मचाऱ्यांचे माहे जुन महिन्यांचे वेत विहीत कालावधी मध्ये अदा करण्यात येणार आहेत ..

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडास माहे जून 2023 चे सवलतमुल्याच्या प्रतिपुर्तीपोटी निधी उपलब्ध करण्याबाबत उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक , महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ , मुंबई यांनी संदर्भाधिन क्र.03 येथील पत्रान्वये शासनास विनंती आहे . त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य  मार्ग परिवहन महामंडळास माहे जून 2023 चे सवलतमुल्याच्या प्रतिपुर्तीपोटी निधी वितरीत करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती .

यानुसार आता सन 2023-24 मध्ये गृह ( परिवहन ) विभागाच्या अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखालील केलेल्या तरतुदीमधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास माहे जून 2023 च्या सवलतमुल्याच्या प्रतिपुर्तीपोटी रुपये 334.52 कोटी एवढा निधी रोखीन प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत आहे .

हे पण वाचा : Pay Commission DA : सरकारी कर्मचाऱ्‍यांना सुखद बातमी , महागाई भत्तामध्ये 45% पर्यंत वाढ , जाणुन घ्या आत्ताची मोठी अपडेट !

सदर रुपये 334.52 कोटी हा खर्च सन 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये उपलब्ध असलेल्या तरतुदींमधून भागविण्यात यावा आणि सदर खर्च वाहनांवरील कर , संचालन व प्रशासन परिवहन आयुक्त आस्थापना , परिवहन आयुक्त अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

यासाठी परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांना प्राधिकृत करण्यात येत असून , त्यांच्या कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी असलेले लेखाधिकारी यांनी सदर रक्कम आहरित करुन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडाळास अदा करण्यात यावी असे आदेश देण्यात आलेले आहेत .

शासन निर्णय

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *