Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Payment Nidhi anudan Shasan Nirnay ] : अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरण करणेबाबत राज्य शासनांच्या महिला व बाल विकास विभागांकडून दिनांक 17 मे 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई , यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते , सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता मागणी क्रमांक – एक्स -1 मुख्य लेखाशिर्ष 2236 – पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अधिकारी / कर्मचारी यांचे मे 2024 व जुन 2024 या महिन्यांच्या वेतना करीता रुपये सत्तर कोटी फक्त इतका निधी वितरीत व खर्च करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहेत .
सदरचा निधी हा पोषण आहार , विशेष पोषण आहार कार्यक्रम , एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प , अंगणवाडी सेवा ( अतिरिक्त राज्य हिस्सा 100 टक्के ) 01 वेतन तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 यांच्या कलम 123 व 261 नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान अतिरिक्त राज्य हिस्सा 100 टक्के , सहाय्यक अपनुदाने ( वेतन ) या लेखा शिर्षांखाली खर्ची टाकण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच सदर निधीकरीता नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे असणार आहेत , त्यांच्याकडे सदरचा निधी सुपुर्द करण्यात येत आहेत . त्यानुसार आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या संदर्भाधिन परिपत्रकामध्ये नमुद केलेल्या तपासणी सूचीतील बाबींची तसेच या संदर्भात नियोजन विभाग व वित्त विभागाने निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना प्रलंबित निकष , वित्तीय अधिकाराचे प्रत्यायोजना यांचे काटेकोर पालन कराण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील महिला व बाल विकास मार्फत दिनांक 17 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.