Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee payment increase from December month ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात माहे डिसेंबर महिन्यांपासुन मोठी वाढ होणार आहे . कारण डिसेंबर मध्ये काही महत्वपुर्ण बाबींवर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे ,याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

महागाई भत्ता वाढ : केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 पासुन आणखीन 3 टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जाईल , कारण सध्यस्थिती सदरचा निर्णय आचार संहितामुळे प्रलंबित आहे . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यांपासुन एकुण 53 टक्के दराने महागाई भत्ताचा लाभ महागाई भत्ता  फरकास लागु करण्यात येणार आहेत .

घरभाडे भत्ता ( HRA ) : राज्य शासनांच्या सातवा वेतन आयोगाच्या नियोजित तरतुदीनुसार , महागाई भत्ताचे दर हे 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास , घरभाडे भत्तामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश आहेत . तर राज्य शासनांच्या वित्त विभाग मार्फत दि.05.02.2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयानुसार , डी.ए चे दर हे 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास वास्तव्याच्या ठिकाणानुसार 30 टक्के , 20 टक्के व 10 टक्के अशी घरभाडे भत्ता मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे .

वेतनत्रुटीचे निवारण : सातव्या वेतन आयोगामध्ये जे काही वेतनत्रेटी आहेत , अशा वेतनत्रुटींचे निवारण करुन सुधारित वेतनश्रेणी लागु , करणेबाबतचा अहवाल वित्त विभागाकडे तयार आहे , तर निवडणुकीनंतर सदरचा अहवाल राज्य शासनांस सादर केला जाईल , व मंजुरी नंतर सुधारित वेतनश्रेणीनुसार , कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये मोठी वाढ होईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *