Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee payment anudan shasan nirnay ] : कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर ते माहे फेब्रुवारी 2025 पर्यंत वेतन अनुदान वितरीत करणेबाबत , राज्य शासनांच्या अल्पसंख्याक विकास विभाग मार्फत दिनांक 28.11.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या शासन निर्णयानुसार , महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग , मुंबई या कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांचे माहे नोव्हेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीतील वेतन व वेतनावरील बाबीकरीता अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत दिनांक 31.07.2024 रोजीच्या पत्रानुसार सचिव , महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग यांनी शासनास विनंती केली आहे .
त्यानुसार सन 2024-25 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीत निधीपैकी बीम्स प्रणालीवर उपलब्ध निधी मधून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग , मुंबई या कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन व वेतन बाबींकरीता अनुदान वितरीत करण्याची बाब शासनांच्या विचाराधीन होती .
सदरच्या निर्णयानुसार , महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग , मुंबई या कार्यालयासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षांमध्ये 2235 , सामाजिक सुरक्षा व कल्याण , 02 समाज कल्याण , 200 इतर कार्यक्रम , राज्य अल्पसंख्याक आयोग 2235 ए 249 , 36 सहायक अनुदाने या लेखाशिर्षा अंतर्गत एकुण रुपये 99,76,000/- ( अक्षरी – नव्याण्णव लक्ष छ्याहत्तर हजार रुपये फक्त ) इतकी अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आलेली आहे .
वेतन अनुदान वितरण संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.