Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Payment Anudan Shasan Nirnay ] : कर्मचाऱ्यांचे माहे मार्च मार्च पेड इन एप्रिल वेतन अनुदान वितरण करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 29 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .

राज्य शासनांच्या शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 19 जानेवारी 2013 रोजीच्या निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील मान्यता प्राप्त प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना निर्णयातील नमुद अटी / शर्तींच्या अधिन राहून 58,16,84,410/- रुपये इतका निधी वेतनेतर अनुदान म्हणून व मुक्त करण्यास सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे . यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , 100 टक्के वेतनेत्तर मध्ये वेतन घेणाऱ्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार दिनांक 01 एप्रिल 2008 रोजी देय असणाऱ्या 5 व्या वेतन आयोगानुसार वेतन अनुदान गोठवून त्या अनुषंगाने 5 टक्के वेतनेतर अनुदान देय होणार आहे .

बालकांच्या मोफत तसेच सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार तसेच मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिनांक 30 मार्च 2013 पर्यंत भौतिक सुविधा व इतर बाबींची पुर्तता करणाऱ्या शाळांना गुणवत्तेनुसार , सर्वात जास्त पटसंख्या असणाऱ्या व प्रत्यक्ष सुरु शाळांना प्राधान्य देवून वेतनेत्तर अनुदान वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

तसेच खाजगी अंशत : / पुर्णत : अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यिमक शाळांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या नियत वयोमानानुसार रिक्त झालेल्या पदांच्या प्रमाणात शिपाई भत्ता अदा करण्यासाठी वेतनेतर अनुदान वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

तसेच सदर वेतनेतर अनुदान आयुक्त शिक्षण संचानालय , राज्य पुणे यांच्या अधिनस्त सुपुर्द करण्यात येत असून , वेतनेतर अनुदानाचे वाटप शासनाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशतील अटी व शर्तींच्या अधिनतेने वाटप करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . या संदर्भात निर्गमित करण्यात आलेला शालेय शिक्षण विभागाचा दिनांक 29 मार्च 2024 रोजीचा सविस्तर शासन निर्णय ( GR ) पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *