Spread the love

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ New Pay Commission ] : सरकारी कर्मचाऱ्यांचे लवकरच भाग्य चमकरणार आहेत , कारण नविन वेतन आयोगा बाबत मोदी सरकारकडून अल्टिमेटम देण्यात आलेले आहेत . ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये मोठी वाढ होईल .

सरकारकडून निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी काहीतरी भेट देण्यात येत असते . आगामी वर्षातील लोकसभेच्या निवडणुकां लक्षात घेवून केंद्र सरकारकडून नविन वेतन आयोग म्हणजेच आठवा वेतन आयोगाची स्थापना करण्याची मोठी शक्यता आहे . केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही माहिती अधिकृत दिलेले नाही .

परंतु सन 2026 मध्ये नविन वेतन आयोग नियोजित असल्याने , पुढील वर्षी आठवा वेतन आयोगाची स्थापना होणे आवश्यक असेल . पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने नविन वेतन आयोगाची स्थापना करुन केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना आकर्षिक केले जावू शकते .

असा असेल नविन वेतन आयोग : आठवा वेतन आयोगानुसार 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे नविन वेतन आयोगाची रचना करण्यात येईल . ज्यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मुळ वेतना 8,000/- रुपयांची वाढ होईल . तर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मुळ वेतनांमध्ये 6,000/- रुपयांची वाढ होईल .

म्हणजेच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मुळ वेतन ( Basic Payment ) हे 18,000/- रुपये वरुन 26,000/- रुपये होईल . तर राज्यातील कर्मचाऱ्यांचा किमान मुळ वेतन हे 15,000/- वरुन 21,000/- रुपये इतका होईल , यामुळे एकुण वेतनांमध्ये मोठी वाढ होईल .

नविन वेतन कधी लागु होईल : नविन वेतन आयोग हे सन 2026 मध्येच लागु होईल , परंतु या अगोदर वेतन आयोगाची स्थापना करण्यात येत असते . सातव्या वेतन आयोगाची स्थापना सन 2014 मध्ये करण्यात आली व सदर अहवालास , सन 2016 मध्ये मंजुरी देण्यात आली .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *