लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या माहे मे महिन्यांच्या पगारासाठी अनुदानांचे वितरण करणे संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.22 मे 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेल्या अनुदानाचा विधी नियंत्रक अधिकारी – आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरीत करण्याची बाब महाराष्ट्र राज्य शासनांच्या विचाराधीन होती . यानुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षातील शालेया शिक्षण व क्रिडा विभागासाठी अर्थसंकल्पित झाला आहे .
व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त करुन देण्यात आलेल्या निधी सदर शासन निर्णयांमध्ये नमुद केलेल्या रक्कमेनुसार नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे.यांमध्ये शालेय शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षण , जिल्हा परिषदा सहाय्यक ,तसेच सर्वसाधारण शिक्षण स्थानिक संस्थांना अनुदाने , अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक , जनजाती क्षेत्र उपयोजना , सैनिकी शाळांमधील शाळां या लेखाशिर्षांखाली अनुदान वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या सदर दि.22 मे 2023 रोजीच्या निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे .
हे पण वाचा : सेवानिवृत्ती नंतरही सेवेत मुदतवाढ / पुनर्नियुक्ती देणेबाबत सुधारित शासन निर्णय !
सदर अनुदानाचे वितरण करत असताना , महाराष्ट्र राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या नियम / कायद्यांचे पालन करण्याचे आदेश सदर शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत .त्याचबरोबर सदरचे अनुदान हे लेखाशिर्षनिहाय ज्या उद्देशासाठी खर्ची करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत , फक्त त्याच उद्देशासाठी खर्च करण्याची आदेश देण्यात आलेले आहे अन्यथा वित्तीय अनियमितता समजण्यात येईल .
मे महिन्यांच्या पगार संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.22 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .
शासकीय कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !