Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee Service Rules ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत , मत्ता व दायित्वाचे विवरणपत्र सादर करणेबाबत सेवानिवयम 19 मध्ये विविध बाबींचा समावेश करण्यात आलेले आहेत . सदर सेवानिवयमांनुसार कर्मचाऱ्यांना मत्ता व दायित्व सादर करणे अपेक्षित आहेत .

प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांने शासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर शासनाने ठरवून देण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये आपल्या मत्ता व दायित्वाचे विवरणपत्र भरुन सादर करणे आवश्यक आहेत . मत्ता दायित्व हे दरवर्षी आर्थिक वर्षाच्या शेवटची भरुन द्यावे लागते . यांमध्ये कर्मचाऱ्यांने त्यास वारस म्हणून प्राप्त झालेलीर / त्याच्या मालकिची अथवा त्याने संपादित केलेली / भाडे पट्याने अथवा तारण म्हणून त्याच्या नावाने अथवा त्याच्या कोणत्याही कुटुंबियाच्या नावाने किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावाने धारण केलेल्या मालमत्तेचा समावेश असला पाहिजेत .

यांमध्ये बँक ठेवीसह शेअर्स , रोख , ऋणपत्रे रकमेचा समावेश होतो . त्याचबरोबर इतर कोणत्याही जंगम मालमत्तेचा देखिल त्यात समावेश असणे आवश्यक आहेत . त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांने काढलेली कर्ज व इतर दायित्वाचाही यांमध्ये समावेश करणे अपेक्षित आहेत .यापैकी वरील नमुद करण्यात आलेले नियम हे साधारणपणे गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना लागू होणार नाहीत .

सदरचे विवरण पत्र भरत असताना त्यामध्ये मुळ वेतन x 2 हून कमी किंमीच्या जंगम मालमत्तेच्या सर्व बाबींच्या किंमती नमुद करणे आवश्यक आहेत . मात्र यांमध्ये आपण दैनंदिन वापरातील कपडे , पुस्तके , काच सामान , भांडी यांच्या किंमती नमुद करण्याची कोणतीही आवश्यक नसणार आहेत .तसेच कोणताही कर्मचारी हा सक्षम प्राधिकाऱ्याला प्रथम कळविल्या खेरी कोणत्याही प्रकारची स्थावर मालमत्ता स्वत: च्या अथवा आपल्या कुटुंबियांच्या नावे खरेदीद्वारे अथवा भेट म्हणून स्वीकारु शकणार नाहीत .

त्याचबरोबर गट अ व ब संवर्गातील अधिकारी मूळ वेतन x 2 पेक्षा अधिक रकमेचा कोणताही व्यवहार व गट क व ड चे कर्मचारी रुपये मुळ वेतन x 2 पेक्षा अधिक रकमेचा कोणताही व्यवहार करीता असल्यस ते सक्षम प्राधिकाऱ्यास त्याबाबत कळविणे आवश्यक असेल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *