सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ करणे संदर्भात सरकारचा मोठा निर्णय !

Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ government employee mahagai bhatta increase nirnay] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ करणे संदर्भात केंद्र सरकारकडून मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे . या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेवुयात ..

सदर महागाई भत्ता वाढ (DA) केंद्रीय कर्मचारी व केंद्र शासनाच्या अधिनस्थ येणाऱ्या स्वायत्त संस्था ( मान्यता प्राप्त ) अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे . सदर महागाई भत्ता वाढ पाचवा व सहावा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता करण्यात आलेली आहे .

सहावा वेतन आयोगातील DA वाढ : सहावा वेतन आयोगामध्ये वेतन घेणाऱ्यांना सध्याच्या 239 % DA वरून 246% DA वाढ करण्यात आली आहे . सदरची महागाई भत्ता वाढ 01 जुलै 2024 पासून करण्यात आलेली आहे .यामुळे 01 जुलै 2024 पासून DA फरकासह वाढीव महागाई भत्ता वाढ मिळणारं आहे.

पाचवा वेतन आयोगातील महागाई भत्ता वाढ : पाचवा वेतन आयोगानुसार , वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या मिळत असलेल्या 433 टक्के वरून DA 455% DA वाढ करण्यात आली आहे .सदरची महागाई भत्ता वाढ 01 जुलै 2024 पासून करण्यात आलेली आहे . यामुळे 01 जुलै 2024 पासून DA फरकासह वाढीव महागाई भत्ता वाढ मिळणार आहे .

सातवा वेतन आयोगातील DA वाढ : सातवा वेतन आयोगामध्ये वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना DA वाढ संदर्भात यापूर्वीच निर्णय घेण्यात आला आहे . यामध्ये 50 टक्के वरून दिनांक 01 जुलै 2024 पासून 3 टक्के DA वाढ लागू केल्याने, एकूण 53% दराने महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment