कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! माहे जुले पासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ , सरकारने घेतला निर्णय !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता ( DA ) मध्ये सुधारणा करणे संदर्भात केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे , नुकतीच केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये चार टक्के वाढ माहे जानेवारी 2023 पासून करणे संदर्भात अधिकृत निर्णय लागू करण्यात आला आहे .

आता सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2023 पासून महागाई भत्ता मध्ये, परत एकदा चार टक्के वाढ करण्यात येणार आहे . ज्यामुळे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचारी त्याचबरोबर केंद्र शासनाच्या अधिनस्त पेन्शनधारक कुटुंब निवृत्तीवेत धारकांना एकूण 46 टक्के दर प्रमाणे DA लाभ अनुज्ञेय होणार आहे .

सध्या केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार , वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस स्तरावरील तसेच निम्न पदांच्या सीपीएससी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या डीए मध्ये सुधारणा करण्यात आली आहे . सदरची DA (महागाई भत्ता ) वाढ ही दि.01.07.2023 पासून लागू करण्यात येत आहे . जुलै 2023 पासून वरील नमूद कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA ) 701.9% दर प्रमाणे लागू करण्यात आलेला आहे . त्याचबरोबर मूळ वेतनात देखील मोठी वाढ करण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : Transfer : राज्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द बाबतचा GR रद्द करणे संदर्भात , आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट !

सदर महागाई भत्ता वाढीचे दर वरील नमूद कर्मचाऱ्यांना माहे ऑगस्ट महिन्याच्या देयकासोबत वाढीव DA प्रत्यक्ष लागू करण्यात येणार आहेत .यामध्ये जुलै महिन्यातील डीए फरकाचा लाभ देखील मिळणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !

Leave a Comment