Live marathipepar , संगीता पवार प्रतिनिधी [ DA Hike ] :- केंद्र सरकार अंतर्गत काम करणारे शासकीय कर्मचारी या सोबतच निवृत्तीवेतनधारक मागील कित्येक दिवसांपासून महागाई भत्ता वाढीबाबतची वाट पाहत होते. या अनुषंगाने निवृत्तीवेतनधारक यासोबतच केंद्रीय कर्मचारी यांना आता महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळेल. अशी माहिती मिळाली आहे.
आता याच अनुषंगाने चालू असलेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी म्हणजेच जुलै महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत यंदाच्या वर्षीचा जो कालावधी असेल तो सहा महिने नंतरचा असेल. तर या कालावधीमध्ये प्रशासनाने चार टक्क्यांची वाढ केली आहे (DA Hike Update). अगोदर शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 42% इतका मिळत होता. त्यामध्ये आता चार टक्क्यांची वाढ केली असल्यामुळे हाच महागाई भत्ता 46% पर्यंत पोहोचला.
केंद्र सरकारने हा जो निर्णय घेतला आहे याचा फायदा देशभरातील तब्बल 46 लाख शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच 68 लाख निवृत्ती वेतनधारक नागरिकांना होणार आहे. आता महागाई भत्ता मध्ये वाढ झाली परंतु पगाराच्या तसेच पेन्शनच्या अनुषंगाने विचार केला तर यामध्ये नक्की किती वाढ होईल? याचे गणित समजून घेणे तितकेच गरजेचे आहे (DA Hike news today). यामुळे आता आजच्या आलेखामध्ये आपण महागाई भत्ता वाढ यासोबतच या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पगारांमध्ये वाढ याचे गणित आपण थोडक्यात समजून घेऊया.
एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला 50 हजार रुपये इतका पगार असेल तर नवीन नियमानुसार किती पगार मिळेल : समजा एखादा कर्मचारी आहे त्याचा पगार सध्या पन्नास हजार रुपये इतका आहे. या अनुषंगाने आतापर्यंत 42 टक्के दराने महागाई भत्ता त्यास मिळत होता. याच अनुषंगाने प्रत्येक महिन्याला 21 हजार रुपये महागाई भत्ता त्या ठिकाणी त्या नागरिकाला मिळत आहे. परंतु यामध्ये आपण चार टक्क्यांची वाढ मिळवली तर त्याच नागरिकाला प्रत्येक महिन्याला 23 हजार रुपये इतका महागाई भत्ता मिळेल (latest news on da hike). म्हणजेच आता याचा अर्थ असा आहे की, ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना शासन पन्नास हजार रुपये पगार देत आहे. त्यांना प्रत्येक महिन्याला आता 52 हजार रुपये पगार मिळेल. म्हणजे म्हणजे एक वर्षाचा जो फायदा आहे तो 24 हजार रुपये असेल.
एक लाख रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन नियमानुसार किती पगार मिळेल : समजा एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला प्रशासन एक लाख रुपये प्रत्येक महिन्याला पगार देत असेल. तर सादर नवीन नियमानुसार पाहण्याआधी जुन्या महागाई भत्त्यानुसार त्या 42 टक्के महागाई भत्ता मिळत होता. आता यामध्ये वाढ होऊन 46 टक्के महागाई भत्ता लागते. शासकीय कर्मचाऱ्यांना मिळेल. म्हणजे आता एक लाख चार हजार रुपये पगार त्यांना मिळणार आहे (da hike from july 2023). यामध्ये आपण एक वर्षाचा फायदा बघितला तर 48 हजार रुपये फायदा प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला मिळेल. ज्यांचा पगार एक लाख रुपये आहे.
महागाई भत्त्याची जी काही थकबाकी असेल ती किती मिळेल : हा जो महागाई भत्ता आहे तो नियमानुसार एक जुलैपासून लागू होईल. त्यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांची थकबाकी मिळणार हे नक्कीच. एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला जर पन्नास हजार रुपये इतका पगार मिळत असेल तर त्याला तब्बल सहा हजार रुपये इतका थकबाकीचा लाभ मिळेल. तसेच एक लाख रुपये पगार असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना नवीन नियमानुसार बारा हजार रुपये इतका थकबाकीचा लाभ मिळेल. तसेच 25 हजार रुपये ज्या नागरिकांचा पगार आहे अशा शासकीय कर्मचाऱ्यांना तीन हजार रुपयांचा लाभ मिळेल.
कसा होईल पेन्शन धारक नागरिकांना फायदा : पेन्शन धारक नागरिकांबाबत सोपे गणित बघायचे झाले तर त्यांच्या सुद्धा महागाई भत्ता ४२ टक्यांवरून 46% झाला आहे. या अनुषंगाने ज्यांना वीस हजार रुपये पेन्शन मिळत आहे अशा शासकीय कर्मचाऱ्यांना आठ हजार चारशे रुपये महागाई सवलत दिली जाणार आहे. तसेच सध्याच्या नवीन नियमानुसार 46 टक्के प्रमाणे विचार केला तर 9200 रुपये महागाई सवलत याच शासकीय पेन्शन धारक नागरिकांना मिळेल.
म्हणजे या नियमानुसार प्रत्येक महिन्याला आठशे रुपयांचे वाढ या ठिकाणी होणार असून, वीस हजार रुपये पेन्शन घेत असणाऱ्या नागरिकांना वीस हजार आठशे रुपये पेन्शन मिळेल. जर एखाद्या पेन्शनधारक नागरिकांना प्रशासन पन्नास हजार रुपये पगार देत असेल तर त्याला 21000 रुपये महागाई सवलत या ठिकाणी मिळणार आहे.
परंतु आता महागाई सवलत या ठिकाणी 46 टक्के पर्यंत वाढेल. जर पन्नास हजार रुपये पेन्शन असेल तर अशा नागरिकांना दोन हजार रुपयांची अतिरिक्त पेन्शन मिळेल. या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांना 52 हजार रुपये मिळणार आहेत. या गणिताचा फायदा देशभरातील 68 लाख पेन्शन धारक नागरिकांना मिळणार आहे.
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.