Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ employee kalabaddh padonnati vetan shreni paripatrak ] : शालेय शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत प्रयोगशाळा सहाय्यक व पदवीधर ग्रंथपाल यांना सातवा वेतन आयोगानुसार कालबद्ध पदोन्नती योजनेच्या वेतनश्रेणीबाबत दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्रक हा शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांच्या दिनांक 16 जुलै 2024 संदर्भातील पत्रानुसार , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या प्रति सादर करण्यात आलेला आहे .
सातवा वेतन आयोगात पदवीधर ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक यांना कालबद्ध पदोन्नती योजना लागू झाल्यानंतर सातवा वेतन आयोगानुसार पदवीधर ग्रंथपाल या पदास S 10 ऐवजी एस 11 ही वेतनश्रेणी लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
त्याचबरोबर प्रयोगशाळा सहाय्यक या पदास S 7 ऐवजी S 8 ही वेतनश्रेणी अनुज्ञेय करण्याचे निर्देश देण्यात आली आहे . त्याचबरोबर दिनांक 01 जानेवारी 2016 पूर्वी कालबाह्य पदोन्नती मिळालेल्या एकाकी पदांना दिनांक 01 जानेवारी 2016 रोजी वेतन निश्चिती करताना वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 01 मार्च 2019 मधील तरतुदीप्रमाणे कालबाह्य वेतनश्रेणी देण्याचे निर्देश देण्यात आली आहेत .
या परिपत्रकामुळे सदर पदावरील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे , याबाबतचा परिपत्रक खालील प्रमाणे पाहू शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.