Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Inter District Transfer Increament Paripatrak ] : आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यांस संबंधित जिल्हा परिषदेत आगाऊ वेतनवाढ देणेबाबत , सामान्य प्रशासन विभाग जिल्हा पदिषद नांदेड मार्फत ग्राम विकास , वित्त विभाग , तसेच सामान्य प्रशासन विभागाचे संदर्भ देवून दिनांक 04 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
ग्राम विकास विभागाच्या दिनांक 03.10.2003 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमुद केल्यानुसार आंतरजिल्हा बदलीने बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता दुसऱ्या जिल्हा परिषदेत शून्य होत असल्याने त्यांना संबंधित जिल्हा परिषदेत त्यांच्या पुर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनिय अहवालाच्या आधारे आगाऊ वेतनवाढ देणे बाबतची योजना पाचव्या वेतन आयोगांमध्ये अस्थित्वात आहे .
सहाव्या वेतन आयोगाच्याा शिफारशीनुसार , दिनांक 01 जानेवारी 2006 पासून शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी देण्यात आली असून , वेतन सुधारणा समितीच्या शिफारशीनुसार एक अथवा दोन आगाऊ वेतनवाढ देण्याची प्रचलित योजना बंद करण्यात आलेली आहे .
सबब ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती सहाव्या वेतन आयोगा लागु झाल्यानंतर म्हणजेच दिनांक 01 जानेवारी 2006 नंतर झालेली आहे व ते सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर आंतरजिल्हा बदलीने नांदेड जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित झालेले आहेत . अशा कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ अनुज्ञेय ठरत नाही , यामुळे ग्राम विकास विभागाच्या दिनांक 03.10.2003 रोजीच्या शासन निर्णयाचा संदर्भ देवून अशा प्रकारची आगाऊ वेतनवाढ देण्यात येवू नयेत , असे सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक खालील प्रमाणे पाहु शकता..