Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Gratuity Increase Shasan paripatrak ] : भारत सरकारच्या कार्मिक , सार्वजनिक तक्रार व निवृत्ती वेतन व निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याण विभागांकडून दिनांक 30 मे 2024 रोजी ऑफीस मेमोरिंडम निर्गमित करुन , केंद्र सरकारच्या उपदानाची रक्कम वाढविण्यात आलेली आहे .

सदरच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या उपदानाची कमाल मर्यादांमध्ये वाढ करुन , महागाई भत्ता ( DA ) चे दर 50 टक्के पर्यंत पाहोचणे तसेच सातव्या वेतन आयोगांच्या करण्यात आलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत . केंद्र सरकारच्या दिनांक 12 मार्च 2024 रोजीच्या ऑफीस मेमोरिंडम नुसार महागाई भत्याचे दर हे 46 टक्के वरुन 50 टक्के करण्यात आलेले आहेत .

केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगानुसार करण्यात आलेल्या शिफारशीनुसार डी.ए चे दर 50 टक्के पोहोचल्यानंतर सेवानिवृत्ती उपदानाची रक्कमेमध्ये वाढ करणे नियोजित होते , यानुसार केंद्रीय नागरी सेवा नियम 2021 अंतर्गत सेवानिवृत्ती उपदान व मृत्यु उपदानाच्या कमाल मर्यादामध्ये दिनांक 01 जानेवारी 2024 पासुन वाढ लागु करण्यात आलेली आहे .

सदर परिपत्रकानुसार दिनांक 01.01.2024 पासुन सेवानिवृत्ती उपदानाच्या कमाल मर्यादांमध्ये 20 लाख रुपये वरुन 25 लाख रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे . याबात केंद्र सरकारच्या अधिनस्त सर्व लेखा / वेतन आणि लेखा कार्यालय व त्यांच्या अधिनस्थ कार्यालयांच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश सदर परिपत्रकानुसार देण्यात आलेले आहेत .

या निर्णयामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे . याबाबत केंद्र सरकार मार्फत दिनांक 30.05.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन आदेश पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *