Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [Employee four days working and 3 leave days ] : जन्मदरातील घटीमुळे देशातील लोकसंख्येचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने , या देशातील सरकारने कर्मचाऱ्यांना आठवड्यातुन चक्क तीन दिवस सुट्टी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे .
जपान देशाची राजधानी येथील टोकियोचे गव्हर्नर युरिको कोईके यांनी जाहीर केल्यानुसार , नविन वर्षापासुन कामाचे दिवस केवळ 4 दिवस असणार आहेत , तर आठवड्यातुन 3 दिवस सुट्टी मिळणार आहे . हा एक प्रकारचा उपक्रम राबविण्यात आलेला आहे .
जपान या देशातील लोक कार्यकुशल आहेत , यामुळे ते मुलांच्या संगोपन अथवा संसती प्राप्तीकडे अधिक लक्ष देत नसल्याचे निदर्शनास आले असून , परिणामी देशातील जन्मदर हा झपाट्याने कमी झाले आहे . याकरीता जपान प्रशासनांकडून विविध प्रकारचे उपाय योजना राबविले जाते .
त्याचाच भाग म्हणून टोकियोचे गव्हर्नर कोईके यांनी सदरचा उपक्रम हाती घेतला आहे . जपानमध्ये झालेल्या अणुहल्यामुळे अजुनही त्या ठिकाणी अपंग मुलं जन्मास येतात , यामुळे बरेच लोकं मुलांना जन्म देण्यास , तयार होत नाहीत .परंतु आता सरकारकडून विविध आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत .
सदर चार दिवस सुट्टीच्या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांना संतती प्राप्तीकरीता चालना मिळणार आहे , यामुळे जन्मदरात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे .