लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये वर्षांतुन दोन वेळा ( एकदा जानेवारी व दुसऱ्यांदा जुलै महिन्यात ) वाढ करण्यात येत असते . ही वाढ केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार ठरविण्यात येत असते . केंद्र सरकारकडून माहे एप्रिल 2023 चे निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत .
माहे एप्रिल 2023 मधील AICPI निर्देशांक 0.9 अंकांने वाढले आहेत , यामुळे एकुण निर्देशांक हा 134.2 वर जावून पोहोचला आहे .यामुळे आता पुन्हा एकदा जुलै महिन्यांत डी.ए मध्ये 4 टक्के वाढ निश्चित आहे . गुजरात राज्य सरकारने निर्देशांकांचे आकडेवारी येण्याच्या अगोदरच राज्य कर्मचाऱ्यांच्या जुलै मधील डी.ए वाढ 4 टक्क्यांनी करण्याचा निर्णय घेतला आहे . केंद्र सरकारकडून देखिल जुलै 2023 मध्ये आणखीण 4 टक्के वाढ लागु करण्यात येणार आहे , यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2023 पासून एकुण 46 टक्के दराने डी.ए लागु होणार आहे .
पगारात होणार मोठी वाढ : मिडीया रिपोर्ट नुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास , कर्मचाऱ्यांना नविन वेतन प्रणाली अंमलात येईल . परंतु केंद्र सरकार नविन वेतन आयोग सहजासहजी लागु करणार नसले तरी , पुढील वर्षांमध्ये केंद्र सरकारला नवा वेतन आयोग म्हणजेच आठवा वेतन आयोगाची स्थापना करावी लागणार आहे .
हे पण वाचा : राज्य कर्मचारी जाणार पुन्हा संपावर , या आहेत नवीन मागण्या !
केंद्रीय राज्य वित्त मंत्री पंकज चौधरी यांना प्रश्नोत्तराच्या तासांत आठवा वेतन आयोगाबाबत विचारले असता , नविन वेतन आयोग / आठवा वेतन आयोग स्थापन करण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले आहेत .फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ करून 3.68 टक्के दराने लागु करण्याच्या मागणीवर शिक्कामोर्तब होणार आहे . नविन वेतन आयेागानुसार वेतनांमध्ये मोठी वाढ होईल परंतु महागाई भत्ताचे दर पुन्हा शुन्य टक्केपासून सुरुवात होईल .
आपण जर शासकीय , निमशासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !