Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Extra Time Work Shasan paripatrak ] : अनेक वेळा शासकीय कार्यालयांमध्ये कामाव्यतिरिक्त बऱ्याच वेळा थांबविण्याच्या तक्रारी येत असतात , यामुळे वारंवार प्रशासनांकडे कर्मचाऱ्यांकडून तक्रारी करण्यात येतात . अशा तक्रारीवर कार्यालय शिक्षण उपसंचालक नागपुर विभागांकडून दिनांक 11 मार्च 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

शाळा सुटल्यानंतर तसेच बेकायदेशिरपणे शिक्षक – कर्मचाऱ्यांना विनाकारण जादा वेळ शाळेत थांबविण्याबाबत , वरील नमुद कार्यालयास अध्यक्ष प्रजासत्ताक शिक्षक , कर्मचारी संघट महाराष्ट्र राज्य या संघटनेने दिनांक 05.03.2024 रोजी कर्मचाऱ्यांच्या वतीने तक्रारीचे निवेदन पत्र सादर करण्यात आलेले होते ,सदर तक्रारी निवेदनावर पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

शाळा सुटल्यावर तसेच बेकायदेशीरपणे शिक्षक – कर्मचाऱ्यांना जादा वेळ शाळेत थांबविण्याबाबत मिळालेल्या निवदनानुसार , सदर निवेदन शिक्षणाधिकारी ( प्राथमिक / माध्यमिक ) जिल्हा परिषद नागपुर , वर्धा , भंडारा , चंद्रपुर , गोंदिया , गडचिरोली यांना  पाठविण्यात आलेले असून , सदर निवेदनावर उचित कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरुन सर्व शाळांना सुचति करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सदर कार्यालयास सादर करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक नागपुर विभाग यांच्या कडून देण्यात आलेले आहेत . या संदर्भात कार्यालय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग , नागपूर यांच्याकडून दि.11 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *