सरकारी कर्मचाऱ्यांना दसरा – दिवाळी सणाची मोठी खुशखबर, DA आणि सण अग्रीमाची , वेतनासोबत लाभ !

Spread the love

Live marathipepar, प्रणिता पवार [ government employee DA , Diwali festival advance ] : सरकारी कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकाबाबत , महत्वपुर्ण आनंदाची अपडेट समोर येत आहे . ती म्हणजे माहे ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत जुलै महिन्यातील डी.ए वाढीचा लाभ तसेच दिवाळी सणानिमित्त सण अग्रिमाची रक्कम प्राप्त होणार आहे , यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळीपुर्वीच मोठी आर्थिक मदत होणार आहे .

दिवाळी सण अग्रिम : दरवर्षी राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच निमशासकीय ( जिल्हा परीषद ) कर्मचारी , तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना 12,500/- रुपये इतकी रक्कम दिवाळी सण अग्रिम म्हणून दिली जात असते .आता राज्यातील कर्मचारी संघटनांकडून सण अग्रिमाची रक्कम 12,500/- रुपये वरुन 25,000/- करण्याची मागणी करण्यात आलेली आहे .यावर राज्य सरकारकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेतील . सदर सण अग्रिमाची रक्कम ही दिवाळी सणांच्या अगोदर देणे आवश्यक असते .

महागाई भत्ताचा वाढीचा लाभ : आपण सर्वांनाच माहित आहे कि , जानेवारी व जुलै अशा सहामहिन्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तांमध्ये वाढ करण्यात येते .सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 मध्ये 4 टक्के डी.ए वाढ देण्यात आली आहे . आता माहे जुलै महिन्यातील डी.ए वाढ बाकी आहे . यावर प्रथम केंद्र सरकारकडून दसरा सणापुर्वी मोठी अपडेट  समोर येणार असल्याची माहिती समोर येत आहे .

मिळालेल्या माहितीनुसार , केंद्र सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना माहे जुलै 2023 पासून परत एकदा 4 टक्के महागाई भत्ता वाढ लागु करण्यात येणार आहे . या संदर्भात अधिकृत्त कार्यालयीन ज्ञापन हे या महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निर्गमित करण्यात येईल , जेणेकरुन कर्मचाऱ्यांना ऑक्टोंबर महिन्याच्या वेतनासोबत प्रत्यक्ष वाढीव डी.ए चा लाभ अनुज्ञेय करण्यात येईल .

राज्य कर्मचाऱ्यांचे काय ? : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांच्या डी.ए मध्ये वाढ लागु केल्यास , केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ लागु करण्यात येत असते .परंतु राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे डी.ए लाभ लागु करण्यास निदान एक महिन्यांचा अवधी निघून जातो .परंतु या वेळेस डी.ए वाढीस अगोदरच विलंब झाल्याने  , केंद्र सरकारने डी.ए वाढ लागु केल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना देखिल राज्य सरकारकडून लगेच डी.ए वाढीबाबत अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करेल .

एकुण महागाई भत्ता 46 टक्के : सध्याचा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 42 टक्के प्रमाणे आहे , आता यांमध्ये आणखीण 4 टक्क्यांची भर पडल्यास एकुण महागाई भत्ता हा 46 टक्के होईल , ज्यांमुळे सरकार कर्मचाऱ्यांच्या पगाराबरोबरच  NPS मधील योगदान / इतर देय भत्ते यांमध्ये देखिल वाढ होईल..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment