Live Marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [ Employee Divali Bonus ] ; महाराष्ट्र राज्य सरकारकडून दरवर्षी दिवाळी सणानिमित्त सण अग्रिम व दिवाळी बोनस जाहीर करण्यात येते , राज्य सरकारी कर्मचाऱ्यापेक्षा निशासकीय कर्मचाऱ्यांना यावर्षी सर्वाधिक दिवाळी सण बोनस जाहीर करण्यात आलेले आहेत . त्यापाठोपाठ पालिका प्रशासनांकडून दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलेले आहेत .
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी 12,500/- रुपये इतका दिवाळी सण अग्रिम जाहीर करण्यात येतो , यावर्षी यांमध्ये 25,000/- इतकी वाढ करण्याची राज्य कर्मचाऱ्यांची मागणी आहे , परंतु यावर अद्याप निर्णय झालेला नाही . परंतु सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा काही निमशासकीय कर्मचारी तसेच पालिका कर्मचाऱ्यांना मोठी रक्कम दिवाळी बोनस म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे .
यांमध्ये सिडकोच्या निमशासकीय कर्मचाऱ्यांना तब्बल 50,000/- रुपये इतकी रक्कम दिवाळी बोनस म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे , जे कि सिडको प्रशासनांने राज्यातील इतर सर्व सरकारी आस्थापने , पालिका प्रशासनांपेक्षा अधिक दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलेले आहेत .
त्यानंतर ठाणे महानगरपालिका प्रशासनांकडून कर्मचाऱ्यांना 21,500/- इतका दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे ,यांमध्ये मागील वर्षांपेक्षा 20 टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे . तसेच आशा सेविकांना 6000/- रुपये इतकी रक्कम भाऊबीज भेट जाहीर करण्यात आली आहे , जे कि राज्य सरकारने केवळ 2000/- रुपये जाहीर करण्यात आली आहे .
त्याचबरोबर कल्याण डोंबिविली पालिका प्रशासनांमधील कर्मचाऱ्यांना 18,500/- रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आले आहेत , जे कि मागील वर्षी 16,500/- रुपये इतकी रक्कम जाहीर करण्यात आलेली होती .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.