राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी सन अग्रिम 2023 चे वेतन अदा करणेबाबत दि.09.11.2023 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !

Spread the love

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Divali Vetan Shasan Nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सन अग्रिम 2023 चे वेतन वाटप करणेबाबत आज दिनांक 09 नोव्हेंबर 2023 रोजी ग्रामविकास विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी जिल्हाधिकारी यांच्या आस्थापनेवार निर्माण केलेल्या स्थायी / अस्थायी पदांना 2023 या वर्षात येणाऱ्या दिवाळी सणाकरीता अग्रीम अदा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागणी करण्यात आली आहे , यानुसार सदर अनुदान वितरीत करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती , यानुसार आता राज्य शासनांने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे .

यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी जिल्हाधिकारी यांच्या आस्थापनेवार निर्माण केलेल्या 126 स्थायी / अस्थायी पदांना 2023 या वर्षात दिवाळी सणाकरीता अग्रीम अदा करण्यासाठी रुपये 6,12,500/- रुपये इतके अनुदान सदर शासन निर्णयांमध्ये नमुद अटी व शर्तींच्या अधिन राहून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून सुपुर्त करण्यात येत आहेत .

तसेच यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , सदर शासन निर्णयाद्वारे मंजुर केलेले अनुदान हे सन 2023 या वर्षात येणाऱ्या दिवाळी सणाकरीता अग्रीम अदा करण्यासाठी वापरण्यात यावेत असे नमुद करण्यात आलेले आहेत .तसेच मंजुर केलेल्या अग्रीमाची रक्कम वेळोवेळी कपात करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची असेल असे नमुद करण्यात आलेले आहेत . त्याचबरोबर मंजूर अनुदानापेक्षा जास्त व अनावश्यक खर्च होणार नाही याची दक्षता संबंधित जिल्हाधिकारी यांची असेल असे नमुद करण्यात आलेले आहेत .

तसेच सदर अनुदानातुन होणाऱ्या खर्चाची मासिक विवरणपत्रे जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्त व शासनाकडे प्रत्येक पुढील 15 तारखेपुर्वी सादर करावेत अन्यथा पुढील महिन्यांकरीता वेतन शासनांकडून अदा केले जाणार नाही तसेच खर्चावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही संबंधित जिल्हाधिकारी यांची असेल असे नमुद करण्यात आलेले आहेत .

जिल्हानिहाय एकुण पदे व जिल्हाधिकारी यांना वितरीत करण्याची एकुण रक्कम खालील विवरण पत्रानुसार पाहु शकता .

या संदर्भात ग्राम विकास विभागांकडून दिनांक 09 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment