Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ employee DA increase News ] : सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळेस महागाई भत्त्यामध्ये वाढ केली जाते , यामध्ये माहे जानेवारी व जुलै महिन्यामध्ये ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक नुसार महागाई भत्त्यामध्ये वाढ केली जाते . केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात येतो . जानेवारी ते जून महिन्याच्या निर्देशांकाच्या आधारे जुलै महिन्यातील डी. ए वाढ निश्चित केली जाते , तर जुलै ते डिसेंबर या महिन्याच्या निर्देशांक नुसार जानेवारी मधील वार्षिक DA  निश्चित केली जाते .

केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून सहकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये तीन टक्के वाढ करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे . सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातो , यामध्ये आणखीन 3 टक्क्यांची वाढ निश्चित करण्यात आलेली आहे .

सदर महागाई भत्ता वाढ संदर्भात वित्त मंत्रालयाकडून तयार करण्यात आलेला प्रस्ताव कॅबिनेट मंजुरी करिता पाठवण्यात आली असल्याची माहिती सूत्राकडून समजली आहे . कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ होईल , केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA वाढ बाबत  तात्काळ निर्णय घेतला जाईल . कारण विधानसभा निवडणुकाच्या आचारसंहिता केव्हाही लागू शकेल , यामुळे केंद्र सरकारने डी .ए वाढ लागू करणे बाबत निर्णय घेतल्यास , राज्य सरकारकडून देखील तात्काळ डीए वाढीचा निर्णय घेतला जाईल .

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ झाल्यानंतर घरभाडे भत्त्यामध्ये देखील वाढ होणे निश्चित आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पगारात मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे . याबाबत अधिकृत निर्णय लवकरच होणार असल्याची माहिती समोर येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *