महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना माहे जुन महिन्यांच्या वेतन देयकासोबत , वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागु करणेबाबत राज्या शासनांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे , सदर शासन निर्णयांनुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना दि.01 जानेवारी 2023 पासून वाढीव 4 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आलेली आहे .
यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये सुधारणा करण्यात आली असून , आता जुन महिन्यांच्या वेतनासोबत रोखीने 4 टक्के म्हणजेच एकुण 42 टक्के प्रमाणे महागाई भत्ता लागु करण्यात आला आहे . तर 01 जानेवारी 2023 ते दिनांक 2023 या कालावधीमधील डी.ए देखिल लागु करण्याचे आदेश देण्यात आल्याने सदर डी.ए फरकाची रक्कम काढण्यासाठी खालील सोप्या पद्धतीने काढू शकता ..
डी.ए फरकाची रक्कम काढण्यासाठी बेसिक X 4/100 = YY , ( YY ) X 5 = पाच महिन्यांची डी.ए थकबाकी फरकउदा . समजा एका कर्मचाऱ्यांचे बेसिक ( मुळ वेतन ) हे 50,000/- रुपये आहे , तर 50000 X 4/100 = 2000/- , 2,000 X 5 = 10,000/- पाच महिन्यांची डी.ए फरकाची रक्कम
वरील सोप्या पद्धतीचा वापर करुन आपल्याला किती डी.ए फरक मिळेल ती रक्कम काढू शकता , सदरची फरकाची रक्कम ही राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुन महिन्यांच्या वेतन देयकासोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे .राज्य शासनांकडून डी.ए मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या निर्णयांमुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये मोठी वाढ होणार आहे .
आपण जर शासकिय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर ,Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !